जळगाव (प्रतिनिधी) शहरातील बळीरामपेठ येथील ५८ वर्षीय वृद्धास आजारपणाच्या उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर त्यांच्यावर गेले विस दिवस उपचार सुरु होते. आज सकाळी त्यांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, रहिवासी राजेंद्र तात्याबा काळे (वय-५८) असे मयताचे नाव आहे. राजेंद्र काळे आजारी असल्याने पुतण्याने त्यांना उपचारार्थ दाखल केले होते. गेले विस दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचार दरम्यान आज सकाळी त्यांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात भाऊ, पुतणे असा परिवार आहे. अविवाहीत म्हणुन ते जीवन जगत होते.
याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक फौजदार उल्हास चऱ्हाटे, दिपक पाटिल करत आहे.