जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा विधी अधिकारीपदी ॲड. गिरीश नागोरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा विधी अधिकारीपदी निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. शासनाने रिक्त असलेल्या जागेसाठी नियुक्ती प्रक्रिया राबवली. यात ४० जणांनी मुलाखती दिल्या. त्यात ॲड. गिरीश नागोरी यांची निवड करण्यात आली आहे. ॲड. नागोरी यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पदभार स्वीकारला.