TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ॲड. रोहिणीताई खडसे यांनी घेतली गृहमंत्र्यांची यांची भेट !

कुऱ्हा येथे पोलीस स्टेशन निर्मिती, सावदा मुक्ताईनगर बोदवड येथे पोलीस कर्मचारी संख्या वाढविण्यासोबत मुक्ताईनगर पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, पोलिस निवासस्थानांचे नव्याने बांधकाम करण्याची केली मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
May 20, 2021
in मुक्ताईनगर, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) जळगाव जिल्हा मध्यवर्तीसह बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर यांनी मुंबई येथे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांची भेट घेऊन त्यांना मुक्ताईनगर मतदारसंघातील गृह खात्यासंबंधित विविध मागण्यांचे निवेदन दिले.

या निवेदनात यात प्रामुख्याने कुऱ्हा काकोडा येथे नविन पोलीस स्टेशनची निर्मिती व्हावी, मुक्ताईनगर, सावदा, बोदवड या पोलिस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची आणखी पदे मंजुर करण्यात यावी, मुक्ताईनगर येथे नूतन पोलीस स्टेशन इमारत, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय इमारत व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांचेकरिता शासकीय निवासस्थान इमारत बांधकाम करणे आणि आणि मुक्ताईनगर सावदा बोदवड येथे पोलिस कर्मचाऱ्यांसाठी असणारे जुने जीर्ण झालेली निवासस्थाने पाडून नविन निवासस्थानांचे बांधकाम करण्यात यावे, या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कुऱ्हा काकोडा येथे मुक्ताईनगर पोलीस स्टेशन अंतर्गत आऊट पोस्ट असुन तिथे तिन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे , कुऱ्हाचे मुक्ताईनगर पासुन अंतर ३५ कि मी असुन कुऱ्हा परिसराला लागून ३० गावांचा समावेश असून याठिकाणी काही अनुचित घटना घडल्यास मुक्ताईनगर वरून पोलीस कुमक पोहचण्यास विलंब लागतो तसेच दिवसेंदिवस या परिसरात गुन्ह्यांची नोंद वाढत असून यातील काही गुन्ह्यात परराज्यातील गुन्हेगारांचा समावेश आहे. यातून एखादया वेळी मोठी अनुचित घटना घडू शकते तरी या परिसरात कायदा व सुव्यवस्था, शांतता अबाधित राहावी यासाठी कुऱ्हा येथे स्वतंत्र पोलीस स्टेशनची निर्मिती होणे जरुरी आहे. तरी कुऱ्हा येथे नुतन पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात यावी.

मुक्ताईनगर मतदारसंघात सध्या स्थितीत मुक्ताईनगर, बोदवड, सावदा येथे पोलीस स्टेशन असून हा परिसर विदर्भ व मध्यप्रदेशच्या सीमेला लागून असून सातपुडा पर्वतरांगांच्या जवळ आहे. या पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या अपुर्ण पडत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने या पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येतो त्या कारणाने सावदा मुक्ताईनगर बोदवड येथील पोलीस कर्मचाऱ्यांची पद संख्या वाढवून देण्यात यावी, ज्यामुळे या परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील व गुन्ह्यांचे प्रमाण नियंत्रणात आणता येईल.

मुक्ताईनगर येथे असणारी पोलीस स्टेशनची इमारत ही जुनी असून लहान आहे. तसेच मुक्ताईनगर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालयाला इमारत उपलब्ध नसून ते भाडेतत्त्वावर असलेल्या इमारतीत सुरू असून मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना शासकीय निवासस्थान उपलब्ध नाही तरी मुक्ताईनगर येथे नूतन पोलीस स्टेशन इमारत, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्या निवासस्थानाकरिता शासकीय जागा उपलब्ध करून देऊन नविन इमारतींचे बांधकाम करण्यात यावे. तसेच मुक्ताईनगर, बोदवड, सावदा येथे असलेल्या पोलीस वसाहतीतील पोलीस कर्मचारी यांचे निवासस्थाना पैकी काही निवासस्थानांची पडझड झालेली आहे तर काहींची जीर्ण अवस्था झालेली आहे. त्यामुळे जनतेची सुरक्षा करण्याऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या परिवाराला या निवासस्थानामध्ये भितीदायक वातावरणात राहावे लागते.

पावसाळ्यात या निवासस्थानांच्या छताला गळती लागते त्यामुळे एखादया वेळी निवासस्थानांची पडझड होऊन अनुचित घटना घडू शकते तरी जीर्ण झालेल्या या पोलिस निवासस्थानांना जमीनदोस्त करून नविन निवासस्थानांची निर्मिती करण्यात यावी, असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सकारात्मकता दर्शवुन जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे कडून या विषयांवर माहिती व प्रस्ताव मागवुन घेऊन विषय मार्गी लावण्याविषयी आश्वस्त केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांना सांगितली हिवरेबाजारच्या कोरोनामुक्तीची यशकथा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गर्दी टाळण्यासाठी भुसावळसह 12 रेल्वे स्थानकावर प्लॅटफार्म तिकीट विक्रीवर बंदी

December 3, 2024

पीडितेनं कपडे घातले असले तरीही शारीरिक संबंधांचा प्रयत्न बलात्कारच ठरतो ; हायकोर्टाचा निर्णय !

March 17, 2022

पाळधीतील एसपी वाइन शॉप फोडले ; तीन लाखांच्या दारूसह चार लाखांची रोकड लंपास !

August 28, 2022

माजी आमदारास महिला अत्याचार प्रकरणी अटक !

October 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group