नाशिक (वृत्तसंस्था) आज दिनांक 10 जानेवारी रोजी नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे बहुचर्चित उमेदवार अॅड. जुबेर शेख यांनी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात निवडणूक अधिकारी यांच्याकडे नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.
नाशिक विभागात पदवीधरांच्या समस्यांना वाचा फोडून पदवीधरांमध्ये शासकीय योजनांची जनजागृती करणारे नेतृत्व म्हणून अॅड. जुबेर शेख यांच्याकडे पाहिले जाते. उमेदवारी अर्ज दाखल करतांना अॅड. जुबेर शेख यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक चुरशीची होणार असे जाणकारांचे मत आहे. अॅड. जुबेर शेख हे वकील असून त्यांचा कायदेविषयक अभ्यास दांडगा आहे व त्यांनी सोशल मिडियाद्वारे विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न कायद्यानेच सोडविणार असल्याचे गर्जना केली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करतांना अॅड. जुबेर शेख यांच्या सोबत नाशिक येथील शिक्षणतज्ञ निलेश ओहल, नॅशनल उर्दू हायस्कूलचे आसिफ शेख सर, ऍड. नाजीमुद्दीन काझी, सागर मोरे, सोनू बागुल, शुभम राजपूत, राहुल मोरे, दानिश शेख, अजय, अनिस शेख, तुंगार अब्दुल रऊफ, शफिक शेख व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी अॅड. जुबेर शेख यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना प्रतिपादन केले की, आजपर्यंत पदवीधरांच्या समस्या ‘जैसे थे’ च आहेत. यामुळे मत देतांना ज्यावेळेस जात, पात, धर्म न पाहता फक्त कार्यक्षमता व जाहीरनामा तपासला जाईल व तेव्हाच मतदान केलं जाईल तेव्हाच पदवीधरांचे ‘अच्छे दिन’ येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.