मुंबई प्रतिनिधी । अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी रोजच नव-नवीन खुलासे होत आहेत. रियाने ड्रग्स घेतल्याची कबुली दिल्यानंतर तिला एनसीबीकडून अटक करण्यात आली. त्यानंतर आता सारा अली खान, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर आणि दीपिका पादुकोणसह आणखी एक मोठी अभिनेत्री एनसीबीच्या रडारवर आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदरील अभिनेत्रीचं वय 40 असून, या अभिनेत्रीनं अनेक हिट्स चित्रपटात काम सुद्धा केलं आहे.
एनसीबीच्या सुत्रांनुसार, 2005-06 दरम्यानचा ड्रग्स पेडलर्स आरोपी अनुज केशवानी आणि अंकुश यांची एनसीबीकडून विचारपूस करण्यात आली. त्यानंतर त्या दोघांनीही एका लोकप्रसिद्ध अभिनेत्रीच्या नावाचा खुलासा केला आहे. सदरील अभिनेत्रीची मॅनेजरच त्या अभिनेत्रीला ड्रग्स आणून देत होती. ती मॅनेजर ड्रग्स पेडलर्स अनुजची प्रेयसी असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे. दरम्यान 2019 साली सदरील अभिनेत्रीसाठी ड्रग्स खरेदी करण्यात आल्याचा सबळ पुरावा एनसीबीच्या हाती लागला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरील अभिनेत्रीने तिच्या मॅनेजरची एक-दोन वेळा भेट सुद्धा घेतली होती. त्यामुळे आता त्या अभिनेत्री अगोदर तिच्या मॅनेजरची चौकशी केली जाऊ शकते. त्यानंतर सदरील अभिनेत्रीला एनसीबीचा सुद्धा सामना करावा लागणार आहे.