जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दरम्यान एकीकडे फडणवीसांच्या भेटीमुळे आश्चर्य व्यक्त होत असतानाच एकनाथराव खडसे यांनीही शरद पवारांच्या निवासस्थानी भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा राजकीय विरोध आता सर्वानाच माहीत आहे. या वादामुळे आपल्याला भाजपमध्ये अनेक त्रास झाला असे खडसे यानी वेळोवेळी सांगितले त्यानंतर त्यांनी जाहीरपणे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या नंतर त्यांनी आपण पक्षावर नव्हे तर फडणवीस यांच्यावर असल्याचे सांगत जाहीरपणे टीका केली होती.