नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हिशिल्ड लस आणि सीरम संस्थेनं तयार केलेल्या लशीला DCGIनं आज सशर्त आपत्कालीन वापरासाठी अखेर मंजुरी दिली आहे. आज सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन DCGI कडून निवदेन देण्यात आलं. ७० टक्क्याहून अधिक ही लस परिणामकारक असल्याचं चाचण्यांच्या अहवालातून समोर आलं आहे. DCGIनं परवानगी दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून पहिली प्रतिक्रिया केली आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आलेल्या दोन लसी भारतात तयार झाल्या आहेत, याचा प्रत्येकाला अभिमान आहे. भारत आत्मनिर्भर होत आहे. कोरोनाच्या दोन लशींना नुकतीच DCGI कडून परवानगी मिळाली आहे. काळजी आणि करुणेचे मूळ असलेल्या आत्मानिर्भर भारतचे स्वप्न आपल्या वैज्ञानिकांनी पूर्ण केले. भारतीयांचे अभिनंदन आणि आपल्या शास्त्रज्ञांनी केलेल्या मेहनतीबद्दल धन्यवाद.’ तसेच पंतप्रधान मोदींनी भारतीय नागरिक आणि भारतीय वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं आहे.
कोरोनावर बनलेल्या तज्ज्ञ समितीने शुक्रवारी सीरमन इंस्टीट्यूटच्या कोविशील्डलाही परवानगी देण्याची शिफारस करण्यात केली होती. यानंतर शनिवारी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनलाही इमरजंसी अप्रुव्हल देण्यासाठी सशर्त मंजूरी देण्याची शिफारस करण्यात आली. आता या दोन्ही व्हॅक्सीनला DCGI कडून परवानगी मिळाली आहे. त्यामुळे, याच आठवड्यात देशभरात लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. सर्व तयारींचा आढावा घेण्यासाठी सध्या देशभार ड्राय रन सुरू आहे.