TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सत्तेचा फेस गेल्यानंतर त्यांना परिस्थितीची जाणीव होईल ; उद्धव ठाकरेंची भाजपासह शिंदे गटावर टीका !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 1, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुबंई (वृत्तसंस्था) : शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने रविवारी उशिरा अटक केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटासह भाजपावर निशाणा साधला आहे.

ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले की, “संजय राऊत माझे मित्र आहेत. संजय राऊत पत्रकार, शिवसैनिक आहेत आणि जे पटत नाहीये ते बोलत आहेत. मरण आले तरी शरण जाणार नाही हे त्यांचे वाक्य चांगले आहे. तेही शरण जाऊ शकले असते. जे तिकडे गेले आहेत त्यांच्याभोवती सत्तेचा फेस आहे. तोपर्यंत ते आमच्यावर टीका करु शकतात. तो फेस गेल्यानंतर त्यांच्या परिस्थितीची जाणीव होईल,” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केली आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

“संजय राऊत यांच्याबद्दल मला नक्कीच अभिमान आहे. कारण आजच्या राजकारणात बळाचा वापर सुरु आहे. बळ तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही इतरांना संपवण्याच्या मागे लागणार असाल तर दिवस हे सारखे नसतात. दिवस हे फिरतात. तुमचं काय होईल याचा विचार सुद्धा करणे भाजप आणि नड्डा यांनी करण्याची आवश्यकता आहे,” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

“मी जे परवा सांगितले त्याला पुष्टी देणारे भाषण भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केले आहे. सर्वच लोकांनी आता डोळे आणि कान उघडे ठेवून आपला देश जिथे हे नेऊ इच्छितात ते होऊ देणे त्याच्यामध्ये सामान्य नागरिकाने ठरवण्याची वेळ आली आहे. लोक २० ३० वर्षे भाजपमध्ये येतात. भाजपसोबत लढणार पक्ष नाही. जे पक्ष संपले नाहीत ते संपतील आणि आपण टिकणार हे जे त्यांचे वक्तव्य आहे हे हुकूमशाहीकडे नेणारे आहे. भाजपचा वंश कुठून सुरु झाला हा महत्त्वाचा मुद्दा आहे,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
हिटलरच्या काळातील परिस्थिती आज आपल्या देशात निर्माण झाली आहे. विरोधात कोणी बोललं तर त्याला अडकवायचचं. पण ठिक आहे न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. ही अटक बघितल्यानंतर मला असं वाटायला लागलंय की, नितीन गडकरी म्हणाले त्याप्रमाणे वाटायला लागलं आहे. राजकारण सोडण्याचा मुद्दा नाही पण ते आता घृणास्पद वाटायला लागलं आहे.

पक्ष संपवायची हौस असेल तर जनतेसमोर जा आणि तुमचे विचार मांडा आणि त्यानंतर जनतेला जो काही निर्णय घेता येईल. आज सत्तेत बसलेल्यांनी बढाई मारण्यात अर्थ नाही. मला अडीच वर्षे मी मुख्यमंत्री होतो पण माझ्या डोक्यात कधी हवा गेली नाही. कारण बाळासाहेब सांगायचे की सत्ता येते आणि जाते पण तू नम्र राहा. मी नम्र राहण्याचा प्रयत्न करत आलो आहे. आज ज्यांच्या डोक्यात हवा गेली आहे त्यांना सांगू इच्छितो की निर्घूणपणाने वागू नका. दिवस आणि काळ हा नेहमीच सगळ्यांसाठीच चांगला असतो असं नाही. तो बदलत असतो, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

सलमान खानला शस्त्र परवाना मंजूर ; मिळाली होती जीवेठार मारण्याची धमकी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पहिल्यांदाच ग्राम कृषी विकास समितीची स्थापना – कृषी मंत्री दादाजी भुसे

September 10, 2020

चाळीसगाव तालुक्यातील १२ पैकी १२ ग्रामपंचायती भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात !

November 6, 2023

निवडणुकांसाठी अजित पवार गटाची मोर्चेबांधणी ; प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे उद्या जिल्ह्यात

July 2, 2025

चोपडा येथील समाजकार्य महाविद्यालयामार्फत वैजापूर येथे आभा कार्ड नोंदणी अभियान !

August 25, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group