जळगाव (प्रतिनिधी) घरकुल घाेटाळ्यात दाेषी ठरवलेले माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आज तब्बल तीन वर्षांनी जळगावात आगमन होणार आहे.
सुरेशदादा जैन हे आज तब्बल तीन वर्षांनी जळगावमध्ये परतणार असल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सुरेशदादा यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी जाेरदार तयारी केली असून रेल्वे स्टेशनपासून ते थेट वाहनापर्यंत त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरण्यात येणार आहे. घरकुल याेजनेतील घाेटाळ्यात सुरेशदादा जैन यांना ३१ आॅगस्ट २०१९ राेजी धुळे विशेष न्यायालयाने त्यांना शिक्षा ठाेठावली हाेती. त्यानंतर जैन यांना तब्बल तीन वर्षानंतर जामीन मंजूर झाला. त्यानंतर प्रथमच ते जळगावात येत आहेत. बुधवारी रात्री ८.४५ वाजता जैन यांचे राजधानी एक्स्प्रेसने जळगावात आगमन हाेईल. या वेळी जैन यांच्या स्वागतासाठी सर्वपक्षातील समर्थकांची उपस्थिती राहणार आहे. गाेविंदा रिक्षा स्टाॅप, नेहरू चाैक, टाॅवर चाैक मार्गे ते ‘७ शिवाजी नगर’ येथे जातील.