TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आदर्शवत आणि प्रेरणादायी – डॉ नरसिंह परदेशी

सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने विद्वत्ता परिषदेचे आयोजन

vijay waghmare by vijay waghmare
March 19, 2025
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी परकीय आक्रमकांशी संघर्ष करून स्वराज्य उभे केले. स्वराज्य उभारणी आणि विस्तारात आपल्या प्रभावशाली नेतृत्त्वाने योगदान देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आदर्शवत आणि प्रेरणादायी असल्याचे मत डॉ. नरसिंह परदेशी यांनी व्यक्त केले.

सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ  यांच्या संयुक्त विद्यमाने मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त), जळगाव यांच्या सहकार्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित ‘विद्वत्ता परिषद व सांस्कृतिक कार्यक्रम’प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले, इ.स. १७३४ साली होळकर घराण्याचे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर मल्हारराव होळकर यांच्या कर्तृतवाने प्रेरित होऊन अहिल्यादेवी होळकर यांनी राज्यकारभार सुरु केला. महाराष्ट्राच्या सीमेबाहेर माळवा प्रांतापर्यंत आपले राज्य विस्तारले. त्यांच्याकडे असलेले नेतृत्वगुण, जिद्द आणि समर्पणवृत्ती यामुळे तब्बल २९ वर्ष त्यांनी यशस्वी राज्यकारभार केला असेही त्यांनी सांगितले.

READ ALSO

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

पुढे बोलतांना ते म्हणाले की, अहिल्यादेवी होळकर यांनी स्थानिक वतनदारांना वतने दिली. दीनदुबळ्या माणसांना मदत केली. ‘गो’पालन करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांच्याकडून आपण प्रतिकूल परिस्थितीतही लढण्याची प्रेरणा घेतली पाहिजे. प्रा. गोपीचंद धनगर यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याविषयी उपस्थितांशी संवाद साधला. वयाच्या नवव्या वर्षापासून आपल्या कर्तृत्वाने सर्वांनाच प्रेरित करणाऱ्या अहिल्याबाईंच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. मात्र त्या सर्व परिस्थितीवर मात केली. शेकडो मंदिरांचा जीर्णोद्धार केला. सर्वसामान्य जनतेला सर्वतोपरी मदत केली असे ते म्हणाले.

कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयीच्या कार्यक्रमांची माहिती दिली. महाराष्ट्राचा इतिहास, कला-संस्कृती या क्षेत्रात देदीप्यमान आहे. त्यात अहिल्यादेवींचे योगदान अमूल्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या डॉ. पवित्रा पाटील यांनी केले. अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी बोलतांना डॉ.पवित्रा पाटील यांनी असे सांगितले की, अत्यंत कमी वयात आपल्या राज्यकारभाराची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या अहिल्यादेवी यांचे कर्तृत्व अफाट होते. त्यांच्या चरित्रातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मूळजी जेठा महाविद्यालयाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या उपप्राचार्या प्रा. सुरेखा पालवे होत्या. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना त्या म्हणाल्या, आलेल्या परिस्थितीला धैयाने सामोरे जाऊन अहिल्यादेवी होळकर यांनी राज्यकर्ती म्हणून आदर्शवत काम केले. त्यांनी श्रमाचे मूल्य जाणले. महेश्वर साडीच्या निर्मितीची प्रेरणा देऊन औद्योगिक धोरणाची चुणूक दाखविली. त्यांची निरीक्षणशक्ती, चाणाक्षपणा हे गुण आपण आत्मसात करून आपण सर्वांनी वाटचाल करणे त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी शाहीर शिवाजीराव पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकर्तृत्त्वावर आधारलेला पोवाडा सादर केला. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार साहेबांच्या विशेष संकल्पनेतून या विद्वत्ता परिषदेचे आयोजन राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विकास खारगे व सांस्कृतिक कार्य संचालनालय संचालक विभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

कार्यक्रमाचे समन्वयक विनोद ढगे यांनी प्रास्ताविक केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाचा पोवाडा सादर केला. यावेळी अधिष्ठाता डॉ. भूपेंद्र केसूर, डॉ. देवानंद सोनार, प्रा. पंडित चव्हाण, डॉ. अनिल क्षीरसागर, डॉ. मनोज महाजन, प्रा. गोविंद पवार, प्रा. डॉ. विद्या पाटील. प्रा. विलास धनवे, डॉ. विजय लोहार, डॉ. जयेश पाडवी, प्रा. रेणुका झांबरे, प्रा. वर्षा उपाध्ये, प्रा. कीर्ती सोनवणे, प्रा. सुनिता तडवी तसेच इतर प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. योगेश महाले यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonAhilyadevi Holkar's work is exemplary and inspiring - Dr. Narsingh Pardeshi

Related Posts

अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 ऑक्टोबर 2026 !

October 2, 2026
जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
Next Post

पैसे परत कर म्हणत महिलेच्या डोक्यात टाकली लोखंडी सळई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज ३८ कोरोनाबाधित, ५० झाले बरे !

December 29, 2020

दोन कंपन्यांमधून चोरट्यांनी लांबवली दोन लाखांची रोकड !

October 8, 2025

यावल तालुका खुनाने हादरला : मुलाने केली वडिलांची हत्या ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

January 15, 2024

अतिवृष्टीग्रस्तांसाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचा मदतीचा हात !

October 31, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group