TheClearNews.Com
Friday, October 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर...

vijay waghmare by vijay waghmare
October 2, 2026
in चाळीसगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगावच्या विकासाच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय झाला असून, महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे सर्व सोयी-सुविधायुक्त नवीन खुले जिल्हा कारागृह स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय १ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे. हे खुले जिल्हा कारागृह चाळीसगाव शहराजवळील बिलाखेड शिवारात होणार असून राज्यातील मोजक्या खुल्या कारागृहांपैकी हे एक कारागृह असणार आहे.

या मंजुरीसाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता. आमदार मंगेश चव्हाण यांनी १५ जुलै २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र देऊन चाळीसगाव येथे कारागृह मंजूर करण्याची मागणी केली होती त्यानुसार माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते.

READ ALSO

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

जळगाव जिल्हा कारागृहावर क्षमतेपेक्षा अधिक बंदींचा ताण

जळगाव शहरात १९६२ पासून २७४ बंदी क्षमतेचे जिल्हा कारागृह अस्तित्वात आहे. मात्र, ३१ जुलै २०२६ रोजीच्या स्थितीनुसार या कारागृहात प्रत्यक्षात ४७४ बंदी बंदिस्त असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. म्हणजेच कारागृहाच्या निर्धारित क्षमतेपेक्षा मोठ्या प्रमाणावर अधिक बंदी येथे ठेवण्यात येत असल्याने जळगाव जिल्हा कारागृहावर मोठा ताण निर्माण झाला होता.

या अतिरिक्त बंदीसंख्येमुळे कारागृह व्यवस्थापनावर ताण येण्याबरोबरच बंदींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही आव्हाने निर्माण होत होती. राज्यातील कारागृहांमधील अतिगर्दी कमी करण्याच्या दृष्टीने नवीन खुले कारागृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बिलाखेड शिवारातील जागा कारागृहासाठी योग्य

चाळीसगाव येथील बिलाखेड शिवारातील प्रस्तावित जागेची राज्याचे कारागृहे व सुधारसेवा, महासंचालक यांनी स्थळपाहणी केली होती. तद्नंतर त्याचा अहवाल शासनास सादर करण्यात आला.

या अहवालानुसार चाळीसगाव येथे नवीन कारागृहासाठी आवश्यक जागा उपलब्ध असून, सदर जागेच्या परिसरात शासकीय रुग्णालय तसेच न्यायालयीन सुविधा उपलब्ध आहेत. तसेच या ठिकाणी पोहोचण्यासाठी आवश्यक वाहतूक सुविधाही उपलब्ध असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन कारागृह उभारणे तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याचा अभिप्राय महासंचालक, कारागृहे व सुधारसेवा यांनी शासनास दिला होता.

३०० बंदी क्षमतेचे सर्व सुविधायुक्त खुले कारागृह

चाळीसगाव येथे उभारण्यात येणाऱ्या या खुल्या कारागृहात बंदी बॅरेक, अधिकारी व कर्मचारी यांची निवासस्थाने तसेच इतर सर्व आवश्यक सोयी-सुविधांसह ३०० बंदी क्षमतेचे कारागृह उभारले जाणार आहे.

विशेष म्हणजे या कारागृहाचे बांधकाम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) मार्फत करण्यात येणार आहे.

चाळीसगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

जळगाव जिल्ह्यातील विद्यमान जिल्हा कारागृहानंतर चाळीसगाव येथे होणारे हे जिल्ह्यातील दुसरे कारागृह ठरणार आहे. तसेच खुले कारागृहाची सुविधा चाळीसगावात उपलब्ध होत असल्याने शहराची ओळख राज्याच्या पातळीवर आणखी अधोरेखित होणार आहे.

प्रस्तावित खुले कारागृह आणि लगतच्या परिसरात प्रस्तावित असलेली अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची इमारत यामुळे भविष्यात कारागृह प्रशासन आणि न्यायालयीन व्यवस्थेतील समन्वय अधिक सुलभ होण्यास मदत होणार असून व्यवस्थापनाचा वेळही वाचणार आहे.

जिल्हास्तरीय सुविधांच्या केंद्रस्थानी चाळीसगाव

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नातून यापूर्वी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय आणि अपर जिल्हाधिकारी कार्यालय यांसारख्या महत्त्वपूर्ण जिल्हास्तरीय सुविधा चाळीसगावात मंजूर झाल्या आहेत. आता खुल्या कारागृहाची भर पडल्याने चाळीसगावमध्ये जिल्हास्तरीय प्रशासकीय, न्यायिक आणि इतर महत्त्वाच्या सुविधा सातत्याने उपलब्ध होत आहेत.

या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन, पालकमंत्री गुलाबरावजे पाटील, कारागृह विभागाचे पोलिस महासंचालक सुहास वारके यांचे आभार मानले आहेत.

चाळीसगावच्या विकासाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा टप्पा असून, जिल्हास्तरीय सुविधांचे केंद्र म्हणून चाळीसगावची वाटचाल अधिक मजबूत करणारे हे आणखी एक पाऊल ठरणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChalisgavMajor success for MLA Mangesh Chavan's persistent efforts

Related Posts

जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
जळगाव

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

September 28, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : नाल्यातील काटेरी झुडूपांमधे सापडली मानवी कवटी व हाडे !

July 26, 2023

Union Budget : नोकरदारांची पुन्हा निराशा ; इन्कम टॅक्स स्लॅब ‘जैसे थे’

February 1, 2022

रावेर येथे पतीने केला पत्नीचा खून ; दोघांना अटक

August 6, 2021

‘प्रतिमा आणि अभ्यास सर्वोच्च स्थानी पोहचवितो’ : नीलकंठ गायकवाड

September 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group