
जळगाव (प्रतिनिधी) – कॉफी शॉपच्या नावाखाली महाविद्यालयीन मुला-मुलींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणाऱ्या हेवन कॅफेवर पोलिसांनी छापा मारला. दि. ३० रोजी केलेल्या कारवाईमध्ये कॅफे मालक विजय राजेंद्र पाटील (वय २९, रा. इंद्रानगर, खेडी, ता. जळगाव) याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात पेट्रोलींग करणाऱ्या दामिनी पथकाला एम. जे. कॉलेज परिसरात असलेल्या हेवन कॅफेमध्ये महाविद्यालयीन मुला-मुलींना अश्लिल चाळे करण्याकरीता जागा उपलब्ध करुन दिली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दि. ३० सप्टेंबर रोजी रामानंद नगर पोलीसांच्या मदतीने दुपारच्या सुमारास दागिनी पथकातील वैशाली माळी, सुनिता जाधव, अंजली राजपूत, रीना महाजन यांच्या पथकाने कॅफेवर छापा टाकला. याठिकाणी तयार करण्यात आलेल्या पार्टीकलच्या कंपार्टमेंटमध्ये अश्लिल चाळे करतांना मिळून आले असून त्यांना तोंडी समज देवून सोडून दिले. तसेच याठिकाणी कुठलाही कॉफी शॉपचा परवाना आणि कॉफी बनविण्याचे साहित्य व खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवलेले नव्हते. याप्रकरणी कॅफे मालक विजय राजेंद्र पाटील (वय २९, रा. इंद्रानगर, खेडी, ता. जळगाव) याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.















