नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे बुधवारी (25 नोव्हेंबर) पहाटे ३.३० वाजता निधन झालं. हा एक दु: खद दिवस आहे. अहमद पटेल हे काँग्रेस पक्षाचे आधारस्तंभ होते. पक्षाच्या सर्वात कठीण काळात ते पक्षासोबत उभे होते, त्यांनी काँग्रेस पक्षातच अखेरचा श्वास घेतला. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, त्यांनी काँग्रेस पक्षातच अखेरचा श्वास घेतला. आम्हाला त्यांची खूप आठवण येईल. फैजल, मुमताज आणि पटेल कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत”. दरम्यान काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही ट्विटरवरुन अहमद पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “अहमदजी केवळ अनुभवी सहकारी नव्हते, मी नेहमीच त्यांच्याकडून सल्ले घ्यायचे. ते नेहमीच खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो”. जवळपास महिनाभरापूर्वी अहमद पटेल यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांचे आरोग्य अधिकच ढासळले होते. जास्त त्रास सुरु झाल्यानंतर त्यांना मेदांता रुग्णालयातील आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. त्यांच्या शरीरातील बहुतांश अवयव निकामी झाल्याने बुधवारी पहाटे साडेतीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
फैजल पटेल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आपणास कळवताना आम्हाला अतिशय दु:ख होत आहे की, माझ्या वडिलांचे निधन झाले आहे. आज पहाटे ३.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला”. फैजल पटेल यांनी पुढे लिहिले आहे की, “मी आमच्या सर्व शुभचिंतकांना विनंती करतो की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंत्यदर्शनसाठी येताना गर्दी होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी”.