अकोला (प्रतिनिधी) येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उमरा येथे वरली मटक्याच्या सट्टापेढीवर कारवाई करत चार जुगाऱ्यांकडून एकूण ३८ हजार ४४० रु मुद्देमाल जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या उमरा येथील सिव्हिल लाइन हद्दीत सुधीर कॉलनीत वरली मटक्याच्या खेळावर पैशांचे आकडे लावत आहेत. यानंतर त्यांनी आपल्या पथकाला योग्य त्या सूचना करत मार्गस्थ केले.
पथकाने उमरा येथील आठवडी बाजारात गोपनीय पध्दतीने केलेल्या कारवाईत शंकर रामभाऊ खारोडे, गजानन रमेश सहारे, स्वप्नील रामकृष्ण खवले तर फरार झालेल्या निलेश जयस्वाल (रा. आडगाव खु) यांच्याकडून नगदी ११ हजार ४४० रु व तीन मोबाईल किं २७ हजार रु असा एकूण ३८ हजार ४४० रु मुद्देमाल जप्त करण्यात आला. उपरोक्त वरली ४ जणांविरुद्ध अकोट ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई अकोला गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनी गोपाल मावळे, पोहेका प्रमोद ढोरे, पोहेका सुलतान पठान, पोका स्वप्नील खेडकर व पोका स्वप्नील चौधरी यांनी केली.