धरणगाव (प्रतिनिधी) रशिया येथे सुरू असलेल्या वर्ल्ड रेसलिंग अर्थात कुस्ती स्पर्धेत धरणगाव येथील बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयाचा माजी विद्यार्थी अक्षय देविदास सोनवणे याने त्याच्याच वजन गटात वर्ल्ड रँकिंगमध्ये चौथा क्रमांक मिळवला आहे.
रशिया येथे सुरू असलेल्या वर्ल्ड रेसलिंग अर्थात कुस्ती स्पर्धेत एकूण 50 देशांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत भारतीय संघात धरणगाव येथील बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयाचा माजी विद्यार्थी अक्षय देविदास सोनवणे याने त्याच्याच वजन गटात वर्ल्ड रँकिंगमध्ये चौथा क्रमांक मिळवला आहे. ही कामगिरी करत त्याने भारतासह धरणगाव तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.