वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) टेस्ला इंक आणि स्पेसएक्स चे संस्थापक एलन मस्क यांच्यासाठी २०२११ या नव्या वर्षाची सुरुवात खऱ्या अर्थानं धमाकेदार झाली आहे. कारणही तसंच आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये एलन मस्क यांना सर्वात वरचं, अर्थात अग्रस्थान मिळालं आहे. एलन मस्क यांची एकूण संपत्ती १८८.५ अब्ज डॉलर म्हणजेच १,३८,४२,७८,९६,७५,००० रुपये एवढी आहे.
मूळच्या दक्षिण आफ्रिकेच्या असणाऱ्या या इंजिनिअरचं नेट वर्थ न्यूयॉर्कमध्ये सकाळी १०:१५ वाजण्याच्या सुमारास १८८.५ बिलियन डॉलर इतकी होती. हा आकडा बेजोस यांच्या तुलनेत $ १.५ बिलियननं जास्त आहे. बेजोस या यादीत २०१७ पासून अग्रस्थानी होते. पण, आता मात्र त्यांची क्रमवारी घसरली आहे. टेस्ला इंक आणि स्पेसएक्स या दोन बड्या कंपन्यांचे संस्थापक एलन मस्क यांनी अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना मागे टाकलं असून मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांची संपत्ती जेफ बेझोस यांच्यापेक्षा १.५ अब्ज डॉलरने अधिक आहे. टेस्लाच्या समभागांमध्ये वाढ झाल्यामुळे एलन मस्क यांच्या संपत्तीत वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. एलन मस्क यांची एकूण संपत्ती १८८.५ अब्ज डॉलर म्हणजेच १,३८,४२,७८,९६,७५,००० रुपये एवढी आहे. इलेक्र्टीक कार निर्मात्यांच्या शेअरची किंमत गुरुवारी ४.८ टक्क्यांनी तेजीत पाहायला मिळाली. ज्यामुळं मस्क यांनी Amazon.com Inc चे संस्थापक जेफ बेजोस यांना पछाडत ब्लूमबर्ग बिलियनेयर इंडेक्समध्ये अग्रस्थानी पोहोचले आहेत. जगातील ५०० श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.
मागील वर्षी टेस्ला कंपनीच्या समभागांमध्ये आठ पटीने वाढ झाली होती. त्यावेळी टेस्ला ही जगातील सर्वात महागडी कंपनी बनली होती. यावेळीसुद्धा समभागांमध्ये वाढ झाल्यामुळे मस्क यांची संपत्ती वाढली होती. ब्लूमबर्गने दिलेल्या रिपोर्टनुसार एलन मस्क यांची टेस्ला कंपनीमध्ये २० टक्के हिस्सेदारी आहे. या वर्षीच्या सुरुवातीलाच गुरुवारी (८ जानेवारी) मस्क यांच्या टेस्ला कंपनीच्या समभागांचे मूल्य पुन्हा वाढले. ही वाढ तब्बल ७.४ टक्क्यांनी होती. गुरुवारी टेस्ला कंपनीच्या समभागाचे मूल्य ८११.३१ डॉलर्स होते. मिळालेल्या माहितीनुसार मागील १२ महिन्यांमध्ये एलन मस्क यांच्या संपत्तीमध्ये १५० अब्ज डॉलर्सने वाढ झाली आहे. मात्र, असे असले तरी फोर्ब्स बिलिनियर्सच्या लिस्टनुसार एलन मस्क यांची संपत्ती अजूनही जेफ बेझोस यांच्यापेक्षा ७.८ अब्ज डॉलर्सने कमी असल्याचं सांगितलं जात आहे.