TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अलिबाबा समूहाचे जॅक मा दोन महिन्यांपासून बेपत्ता?

The Clear News Desk by The Clear News Desk
January 4, 2021
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

बीजिंग (वृत्तसंस्था) चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे अब्जाधीश, चीनमधील सर्वात मोठी ऑनलाइन कंपनी असणाऱ्या अलिबाबा समूहाचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष जॅक मा यांनी मागील दोन महिन्यांपासून सर्वजनिक कार्यक्रमांना उपस्थिती लावलेली नाही. त्यामुळे जॅक मा हे बेपत्ता असल्याचा भीती व्यक्त केली जात आहे. मागील दोन महिन्यांपासून जॅक मा हे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहिलेला नाहीत.

आलिबाबाचे संस्थापक असणारे जॅक मा हे त्यांच्या स्वत:च्या टॅलेंट शोच्या म्हणजेच आफ्रिकाज् बिझनेस हिरोज या कार्यक्रमाच्या अंतिम सामन्यासाठी उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जॅख मा हे या कार्यक्रमाच्या अंतिम फेरीसाठी प्रशिक्षक म्हणून उपस्थित राहणार होते. मात्र अगदी शेवट्या क्षणी जॅक यांच्या जागी अलिबाबा कंपनीच्या अन्य एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या कर्यक्रमाला उपस्थिती लावली. हे सर्व प्रकार नोव्हेंबर महिन्यामध्ये घडल्याचे युनायटेड किंग्डममधील टेलीग्राफने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कंपनीचे संस्थापक असणाऱ्या जॅक मा यांचा फोटोही वेबसाईटवरुन काढून टाकण्यात आल्याचे निदर्शनास आलं आहे. नोव्हेंबर महिन्यामधील या कर्यक्रमाला जॅक मा हे अनुपस्थित राहिल्यासंदर्भात नंतर त्यांच्या अधिकृत प्रवक्त्यांनी सारवासारव करणारी उत्तरं दिली. जॅक मा यांच्या नियोजित कार्यक्रमामध्ये अडचणी येत असल्याने ते या शोच्या अंतिम फेरीसाठी उपस्थित राहू शकले नाही.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

जॅक मा यांनी २४ ऑक्टोबर रोजी बीजिंगमध्ये वादग्रस्त भाषण देत चीनच्या नियामक प्रणालीवर टीका केली होती. बँकिंग व्यवस्थेचाही त्यांनी समाचार घेतला होता. या भाषणापासूनच त्यांचं उद्योग साम्राज्य चीन सरकारच्या निशाण्यावर आहे. आजची वित्तीय व्यवस्था ही अत्यंत जुन्या उद्योगावर आधारित आहे. नव्या पिढीसाठी यात निश्चितच बदल केले पाहिजेत, असं जॅक मा म्हणाले होते. जॅक मा यांचा उद्योक अँट आयपीओला चीनच्या प्राधिकरणाकडून हिरवा कंदील मिळाला होता. पण या भाषणानंतर काही आठवड्यातच त्याचा परवाना रद्द करण्यात आला. अँटमध्ये विविध त्रुटी असल्याचा ठपका शांघाय स्टॉक एक्स्चेंजने ठेवला होता.

चीन सरकारच्या हाती असणाऱ्या यंत्रणांनी अलिबाबा कंपनीविरोधात मत्तेदारी स्थापन करण्यासंदर्भातील चौकशी सुरु केली. डिसेंबर महिन्यामध्ये ही चौकशी सुरु झाली आणि त्यानंतर एएनटी कंपनीला त्यांची रचना बदलण्यासंदर्भातील सूचना सरकारी यंत्रणांनी केल्या. जॅक मा यांनी मध्यंतरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका, युरोप आणि जागतिक आरोग्य संघटनेला कोट्यावधी फेस मास्क मदत म्हणून पाठवले होते. शिक्षण, व्यवसाय, महिला नेतृत्त्व आणि पर्यावरण या क्षेत्रात जॅक मा समाजसेवा करतात. जॅक मा यांनी अखेरचं ट्वीट गेल्या वर्षी १० ऑक्टोबर रोजी केलं होतं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

शिरसगाव येथे पाच वर्षीय चिमुकलीवर बलात्कार; नराधमास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘आंदोलनजीवीं’नी शेतकऱ्यांच्या पवित्र आंदोलनाला अपवित्र करण्याचं काम केलं : पंतप्रधान मोदी

February 10, 2021

सर्पदंशानंतर जिवंत साप घेऊन ‘तो’ पोहचला थेट रुग्णालयात !

October 3, 2021

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित !

November 19, 2021

जिल्ह्यात आज आढळले अवघे ६ कोरोनाबाधित !

September 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group