जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात सुरु असलेला अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी मंगळवारी गेलेल्या चार पथकांचा वाळू तस्करांकडून पाठलाग करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यामुळे पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मोबाइलचे सीडीआर अर्थात कॉल डिटेल्स रेकॉर्ड तपासण्याच्या तपासण्याच्या सुचना पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांना दिल्या आहेत.
ठेक्यांची लिलाव प्रक्रिया प्रस्तावित आहे. अशात जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळु वाहतुकीविरोधात जिल्हा प्रशासनाने कारवाईचे अस्त्र उगारले आहे. जिल्ह्यात दि. २ रोजी विविध ठिकाणी महसूल अधिकाऱ्यांचे पथक कारवाईसाठी पाठविण्यात आले होते. कारवाईसाठी गेलेल्या पथकांच्या वाहनांमागे त्यांच्यावर पाळत ठेवणारे आढळून आले. या पाळत ठेवणाऱ्यांचे चार दुचाकी प्रशासनाने जप्त केल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या वाहनामागे पाळत ठेवणाऱ्यांची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे.
वाळूच्या कारवाईसाठी गेलेल्या पथकावर पाळत ठेवणाऱ्यांविषयी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्यात चर्चा झाली. पथकावर पाळत ठेऊन असणाऱ्यांची मोक्याची ठिकाणे आणि त्यांची माहिती याविषयी सखोल चौकशी केली जाणार आहे. तसेच अशा पाळत ठेवणाऱ्यांवर प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिली. जिल्ह्यातील नदीपात्रातून वाळू चोरी करण्यासाठी आता तराफ्यांचा वापर सुरू झाला असून महसूलच्या पथकाने केलेल्या कारवाईत तराफे जप्त करुन ते जेसीबीच्या सहाय्याने नष्ट केले आहेत.