अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मंगरूळ येथे घरफोडी करत अज्ञात चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केली आहे.
या संदर्भात अधिक असे की, सुनील बापू पवार हे मंगरूळ येथील रहिवाशी आहेत. दि. १८ ते १९ जुलैदरम्यान, अज्ञात चोरट्याने श्री. पवार यांच्या घरात प्रवेश करून मोबाईल, सोने दागिने व रोख रक्क्म चोरुन नेली. त्यात तीन मोबाईल, ३ हजार रोख आणि ३२०० रुपयांचे सोनेचे दागिने, असा एकूण ७१ हजाराचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि गंभीर शिंदे हे करीत आहेत.