अमळनेर (प्रतिनिधी) ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशियन व आमदार जगन्नाथ शिंदे यांच्यावतीने राजमुद्रा फाउंडेशनच्या मागणीवरून अमळनेरसाठी दोन ऑक्सिजन मशीन मिळाले आहेत.
अमळनेर तालुका व परिसरात covid-19 चा प्रादुर्भाव अचानक खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याने रुग्णसंख्या वाढली आहे. अश्या परिस्थितीत अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसून, हॉस्पिटल हाऊसफुल्ल झालेत. बेड उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढत आहे. याचाच एक भाग म्हणून सामाजिक बांधिलकीने ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशियन व आमदार आप्पासो जगन्नाथ शिंदे यांच्यावतीने राजमुद्रा फाउंडेशनच्या मागणीवरून अमळनेरसाठी दोन ऑक्सिजन मशीन उपलब्ध करून देण्यात आले.
यावेळी विजय सुराणा (ठाणे जिल्हा सेक्रेटरी), अजित पारख (पी.आर.ओ.) व भूषण भदाने (प्रदेशाध्यक्ष फार्मसी स्टुडंट कौन्सिल) आदी उपस्थित होते. राजमुद्रा फाउंडेशन व नगरसेवक शाम पाटील यांच्या मागणीला यश मिळाले असून रुग्णांची हेळसांड थांबणार आहेत. यापैकी एक ऑक्सिजन मशीन सध्या अमळनेर ग्रामीण रुग्णालयाला सुपूर्द करण्यात आलेले आहे.