जळगाव (प्रतिनिधी) अमळनेरचे प्रभारी निरीक्षक जयपाल हिरे यांच्याकडे जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचा तात्पुरता पदभार देण्यात आला आहे.
एमआयडीसीचे प्रताप शिकारे यांची पदोनित्ती बदली झाल्याने काही दिवसापासून दुय्यम अधिकाऱ्याकडे पदभार होता. परंतू अनुभवी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडे पदभार असावा म्हणून अमळनेरचे प्रभारी निरीक्षक जयपाल हिरे यांची गुरुवारी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अमळनेर पोलीस स्थानकाचा पदभार पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांच्याकडे सोपवल्याची माहिती पोलीस अधीक्षक जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी ‘द क्लिअर न्यूज’सोबत बोलतांना दिली आहे. दरम्यान, निरीक्षक जयपाल हिरे हे आज रात्रीतून पदभार स्वीकारणार असल्याचे कळते. तसेच जयपाल हिरे यांच्याकडे जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचा कायम स्वरूपी पदभार दिला जाणार असल्याचे कळते.