अमळनेर (प्रतिनिधी) वेब मिडीया असोसिएशन, मुंबईची अमळनेर तालुका कार्यकारणी आज जाहीर झाली.
संस्थापक अध्यक्ष तथा ओबीसी नेते अनील महाजन यांच्या आदेशानुसार व नेतृत्वाखाली वेब मिडीया असोसिएशनचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अजयकुमार जैस्वाल यांनी आज जिल्हाध्यक्ष ईश्वरभाऊ चोरडीया व जिल्हा उपाध्यक्ष महेश पी शिरसाठ व जिल्हा सचिव कमलेश वानखेडे व जिल्हा सरचिटणीस ईश्वर महाजन यांच्या उपस्थितीत अमळनेर तालुका वेब मिडीया असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर केली.
यात तालुकाध्यक्षपदी दिव्य लोकतंत्र चे संपादक समाधान एकनाथ मैराळे तर सचिव म्हणून दिव्य खान्देशचे संपादक सुरेश हिरामण कांबळे यांची निवड झाली. तर तालुका उपाध्यक्ष नुरखा मुख्तारखा पठाण, सरचिटणीस युवराज पाटील, समन्वयक आबीद शेख, खजिनदार गणेश पाटील, सह-समन्वयक मनोज चित्ते, कार्यकारिणी सदस्य रोहीत बठेजा, सत्तार खान, लक्ष्मीकांत सोनार यांची निवड झाली. या निवडी बाबत सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.