अमळनेर (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेचे ७७ गट व पंचायत समितीच्या १५४ गणांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात येत आहे. आपला गट, गण कोणत्या आरक्षणात मोडतो, याकडे जिल्ह्यातील इच्छुकांचे लक्ष लागले होते. दरम्यान, अमळनेर तालुक्यातील पंचायत समितीच्या १० गणसाठीचे नुकतेच आरक्षण निघाले आहे.
अमळनेर तालुक्यातील पंचायत समिती १० गणासाठीचे आरक्षण निघाले आहे. त्यानुसार अमळनेर तालुक्यातील प.स.गण आरक्षण पुढीलप्रमाणे, 1) जानवे गण- अनुसूचित जाती महिला, 2) मंगरूळ गण- अनुसूचित जमाती, 3) दहिवद गण- अनुसूचित जमाती महिला, 4) सारबेटे बु – नामाप्र महिला, 5) मुडी प्र.डा. गण- नामाप्र सर्वसाधारण, 6) मांडळ गण- सर्वसाधारण, 7) कळमसरे गण-सर्वसाधारण, 8) प्र डांगरी गण- सर्वसाधारण महिला राखीव, 9) पातोंडा गण- सर्वसाधारण महिला राखीव, 10) अमळगाव गण- सर्वसाधारण, असे आरक्षण निघाले आहे. येथील इंदिरा भुवन हॉलमध्ये प्रांताधिकारी सीमा अहिरे तसेच तहसीलदार मिलींद कुमार वाघ यांचा नियंत्रणाखाली हा कार्यक्रम पार पडला.