अमळनेर (प्रतिनिधी) येथील चोरीच्या घटनेतील संशयित आरोपी इमरान पठाण याला शिंदखेडा येथून अमळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यासंदर्भात अधिक असे की, फिर्यादी अशोक पाटील (वय ६५ धंदा शेतमजुरी रा. पैलाड) यांनी शेती कामासाठी १६ जुलै रोजी घरातील सोने तारण ठेवुन अर्बन बँक येथून ५५ हजार रुपये कर्ज घेतले. सदरचे पैसे त्यांनी त्यांच्या पँटचे खिश्यात जवळच लघुशंकेसाठी गेले असता. दुपारी १२.४५ वाजेच्या सुमारास अज्ञात इसमाने त्यांना मागुन धरुन त्यांचे पँटच्या खिश्यातील पैसे जबरदस्तीने काढून घेतले. सदर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यातील आरोपी पळतांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होता. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरून सदर गुन्हयातील आरोपी इमरान पठाण (रा.शिंदखेडा जि.धुळे) असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन अमळनेर पोलीस स्टेशनचे पोहेकॉ सुनिल हटकर, पोना दिपक माळी, पोना शरद पाटील व पोकॉ रविंद्र पाटील यांच्या पथकाने शिंदखेडा येथून ताब्यात घेतले.
इमरान पठाण (वय ३०) याने सदर गुन्ह्याची कबुली देवुन सदरचे पैसे मीच जबरदस्तीने चोरुन नेले बाबत कबुली दिली. सदर आरोपी यास गुन्हयाकामी अटक करण्यात आली असून त्यास काल दि. ३१ जुलै २०२१ रोजी न्यायालय समोर हजर केले असता त्यास न्यायालय यांनी ३ जुलै पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मजुर केली.