जळगाव ( प्रतिनिधी ) : दीड वर्षांसाठी हद्दपार असलेला पोलीस रेकॉर्डवरील अमन उर्फ खेकडा रशीद सैय्यद (वय २४, रा. सुप्रिम कॉलनी) हा विना परवानगी शहरात फिरतांना मिळून आला. दि. ११ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सुप्रिम कॉलनीतील अमन उर्फ खेकडा रशीद सैय्यद हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याला दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी अठरा महिन्यांकरीता हद्दपार करण्यात आले आहे. परंतू तो कुठलीही परवानगी न घेता दि. ११ जानेवारी रोजी एमआयडीसीतील एच सेक्टरमधील पुष्पा पेट्रोलपंपाच्या मागील बाजूस पोलिसांना मिळून आला. याप्रकरणी पोलीस कर्मचारी रमाकांत साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ संजीव मोरे हे करीत आहे.
















