जळगाव : चंद्रपूर जिल्हा तायक्वांडो असोसिएशन, तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९ ते २१ रोजी चंद्रपूर येथे कॅडेट राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचा संघ सहभागी झाला होता. यामध्ये १७६ से. मी. उंची मध्ये रावेर तालुका असोसिएशनचा अमर शिवलकर याने कांस्यपदक पटकावले तर पहुर येथील शौर्य तायक्वांडो अकॅडमी ची खेळाडू स्वाती चौधरी हीने कांस्यपदक पटकावले त्यांना प्रशिक्षक जयेश कासार रावेर, तसेच हरीभाऊ राऊत पहुर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेत जयेश बाविस्कर ( एन आय एस ) प्रशिक्षक यांनी तांत्रीक जबाबदारी निर्विवाद पार पाडली. यावेळी राज्य संघटनेच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.यांच्या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष श्री अतुल भाऊ जैन, उपाध्यक्ष श्री ललीत पाटील, कोषाध्यक्ष श्री सुरेश खैरनार, महासचिव श्री अजित घारगे, सहसचिव श्री रविंद्र धर्माधिकारी, सदस्य श्री महेश घारगे, श्री नरेंद्र महाजन, श्री कृष्णकुमार तायडे, श्री सौरभ चौबे यांनी कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.