TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अॅमेझॉन कंपनीने कोट्यवधी रुपयांची लाच दिली ; पाँचजन्यचा अॅमेझॉनवर गंभीर आरोप !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 30, 2021
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक मुखपत्र असणाऱ्या ‘पांचजन्य’ने भारतामधील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या ‘इन्फोसिस’नंतर आता जगभरामध्ये आघाडीची ई-कॉमर्स कंपनी असणाऱ्या ‘अ‍ॅमेझॉन’वर निशाणा साधला आहे. या साप्ताहिकाने आपल्या नव्या अंकात अॅमेझॉन कंपनीने सरकारी धोरणे आपल्या बाजूने व्हावीत म्हणून कोट्यवधी रुपयांची लाच दिल्याचा आरोपही केला आहे. ‘द वायर’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

पाँचजन्यचा हा नवा अंक येत्या ३ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होत असून या अंकाच्या मुखपृष्ठावरच ‘ईस्ट इंडिया कंपनी २.०’ असा मथळा मांडत अॅमेझॉनचे मालक जेफ बेझोस यांचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. १८ व्या शतकात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारताचे शोषण केले तसे शोषण अॅमेझॉन करत असून ही कंपनी ईस्ट इंडिया कंपनीचा दुसरा अवतार असल्याचे पाँचजन्यचे म्हणणे आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

अॅमेझॉनला संपूर्ण भारतीय बाजारपेठेवर कब्जा करायचा असून त्यांना मक्तेदारीही प्रस्थापित करायची आहे. यासाठी या कंपनीने सामान्य भारतीय नागरिकाचे स्वातंत्र्य, देशाची अर्थव्यवस्था, राजकीय व्यवस्था आपल्या ताब्यात घेतल्याची टीका पाँचजन्यने केली आहे. पाँचजन्यच्या अंकात ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइमवरही टीका करण्यात आली आहे. या प्लॅटफॉर्मवर दाखवले जात असलेले चित्रपट, मालिका भारतीय संस्कृतीला मारक असून त्याने भारतीय संस्कृतीचा नाश सुरू केला असल्याचे पाँचजन्यचे म्हणणे आहे.

पाँचजन्यने अॅमेझॉनवर भ्रष्टाचार व लाचलुचपतीचाही आरोप केला आहे. सरकारी धोरणे आपल्याला धार्जिणी व्हावीत म्हणून अॅमेझॉनने कोट्यवधी रुपयांची लाच दिल्याचे पाँचजन्यचे म्हणणे आहे. फ्युचर ग्रुप ताब्यात घेण्यावरून अॅमेझॉनची कायदेशीर लढाई सुरू आहेत. याची चौकशी कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाकडून सुरू आहे. २०१८-२० या काळात भारतामध्ये आपले अस्तित्व राहावे म्हणून अॅमेझॉनने लाच व कायदेशीर लढाईसाठी सुमारे ८,५४६ कोटी रु. खर्च केल्याचा अंदाज असून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने केली होती. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित असलेल्या स्वदेशी जागरण मंचने अॅमेझॉनकडून देशाच्या कायद्याचे थेट उल्लंघन केले जात असल्याचा आरोप केला होता. अॅमेझॉन बेकायदा मार्गाने आपला व्यवसाय देशात करत असल्याचे स्वदेशी जागरण मंचाचे म्हणणे आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित, १ झाला बरा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सहकार आणखी भ्रष्टाचार ; शिवराम पाटलांची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल !

July 15, 2021

औरंगाबादच्या महापौरांना कोरोनाची लागण !

September 22, 2020

जळगाव हादरलं : स्पा सेंटरच्या मालकाकडून महिलेवर बलात्कार ; तिघांविरुद्ध गुन्हा !

March 16, 2022

धक्कादायक : पशुवैद्यक तरुणीनं नशेच्या गर्तेत मित्रांना दिलं घोड्यांचं इंजेक्शन ; पुढे काय झालं…वाचून तुम्हाला बसेल धक्का !

November 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group