जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (amol mitkari) यांनी ब्राम्हण समाजाबाबत केलेल्या विधानावर भाजपचे नेते, माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी संताप व्यक्त केला. आमदार अमोल मिटकरी सत्ताधारी पक्षाचे आहेत. त्यामुळे उचलली जीभ लावली टाळ्याला असे त्यांनी करू नये. अमोल मिटकरी हे जिभेला हाड नसलेला आमदार आहेत. त्यांनी बोलताना जातीय विष पेरले जाणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे, अशा शब्दात महाजनांनी मिटकरी यांना खडेबोल सुनावले.
गिरीश महाजन म्हणाले, ”आमदार अमोल मिटकरी सत्ताधारी पक्षाचे आहेत. त्यामुळे उचलली जीभ लावली टाळ्याला असे त्यांनी करू नये. अमोल मिटकरी हे जिभेला हाड नसलेला आमदार आहेत. त्यांनी बोलताना जातीय विष पेरले जाणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे,”
राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुनही राज्य सरकारवर गिरीश महाजन यांनी यावेळी टीका केली. ते म्हणाले, “सत्ताधारी तीनही पक्षांचे तोंड तीन बाजूला आहे. त्यामुळे कोणत्याही विषयी राज्य सरकारचे एकमत होत नाही. आतापर्यंत अशी स्थिती राज्याची कधी नव्हती व इतके वाईट दिवस राज्याला कधी आले नाही,”
अमोल मिटकरी यांची मंत्रोच्चारणा आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या मंत्रोच्चारणाचा निषेध करत ब्राम्हण महासंघाने काल पु्ण्यात राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आंदोलन केले. यावेळी या आंदोलकांचा मिटकरी यांच्याविरोधात कमालीचा रोष दिसून आला. लग्नाचा विधी, कन्यादान याविषयी अमोल मिटकरींनी केलेल्या विधानांमुळे ब्राह्मण, हिंदू समाजाची बदनामी झाल्याचा आरोप ब्राह्मण महासंघातर्फे करण्यात आला.