TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमरावती : विवाहबाह्य संबंध अन् दोघांनी गमावला जीव ; हत्याकांड घडविणारा तिसरा कोण?

The Clear News Desk by The Clear News Desk
February 25, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमरावती (वृत्तसंस्था) अचलपूर तालुक्यातील येणी पांढरी शिवारात महिला व पुरुषाचा मृतदेह आढळला. बुधवारी ही घटना उघडकीस आली. हत्या की आत्महत्या, याबाबत संभ्रम कायम आहे. मात्र, मृत महिलेच्या पतीने ही हत्याच असल्याचा दावा केला असल्याने हे हत्याकांड घडविणारा तिसरा कोण? याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर चार टीम तयार केल्या आहेत. ज्यामध्ये सहा अधिकारी व 24 कर्मचारी अशा एकूण 30 जणांची नियुक्ती करण्यात आली. आता या चारही टीम स्वतंत्र तपास करणार आहेत. प्रथमदर्शनी पोलिसांना ही आत्महत्या वाटत असली तरी बुधवारी रात्री मृत महिलेच्या पतीने परतवाडा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आता त्या दृष्टीने तपासाला सुरुवात केली आहे.

READ ALSO

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

पांढरी येथील राकेश अग्रवाल यांच्या शेतात सुधीर रामदास बोबडे (वय 52 वर्ष) आणि 48 वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला होता. विवाहबाह्य प्रेमसंबंधातून हे हत्याकांड घडलं असावं असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या हत्याकांडाचे गांभीर्य पाहता शवविच्छेदन अहवाल, फॉरेन्सिक टीमकडून झालेला तपास आणि पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या चार टीमचा नेमका तपास या सगळ्यानंतरच या प्रकरणातील गूढ पुढे येणार आहे.

पांढरी येथील घटनास्थळी पोलिसांच्या विविध टीमने गुरुवारी पुन्हा एकदा सर्चिंग केलं. काही पुरावा आढळून येतो का? याचा बारकाईने तपास करण्यात आला. प्राथमिक तपासात अजून ठोस पुरावा पोलिसांना मिळालेला नाही. परंतु, मोबाइल कॉल रेकॉर्ड आणि इतर काही गोष्टींमुळे दोघांची हत्या झाली असण्याची दाट शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.

विवाहबाह्य संबंधामुळे जीव गमावला?

मृत महिला व सुधीरची पत्नी यांच्यात यापूर्वी दोघांच्या प्रेमसंबंधाच्या कारणावरुन हाणामारी देखील झाली होती. सुधीर आणि अलका या दोघांचे प्रेमसंबंध असल्याचे समजताच सुधीरच्या पत्नीने तिच्या घरासमोर येऊन जोरदार भांडण केलं होतं. अशातच सुधीर व अलका हे एकमेकांना चाकूने मारून हत्या करु शकत नाहीत. असं सध्या तरी म्हटलं जात आहे. त्यामुळे या दोघांवर कोणीतरी पाळत ठेवून त्यांची हत्या केली असावी असं फिर्यादीत म्हटलं आहे. त्यामुळेच पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी गुरुवारी सकाळी पांढरी येथील घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर जिल्हा क्राईम बँच, परतवाडा, अचलपूर व सरमसपुरा येथील अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली व आवश्यक सूचना दिल्या.

हत्या घडविणारा तिसरा व्यक्ती कोण?

बुधवारी शवविच्छेदनासाठी वेळ झाल्याने सुधीर बोबडे याच्या मृतदेहाचे गुरुवारी सकाळी तीन डॉक्टरांच्या चमूने शवविच्छेदन केले. त्यानंतर दुपारी अंत्यसंस्कार पार पडले. कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलिसांनी येथे चोख बंदोबस्त ठेवला होता. सध्या या प्रकरणाचा स्वतंत्र तपास करण्यात येत असून आवश्यक ते निर्देश दिले असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं. अचलपूरचे एसडीपीओ गौहर हसन हे तपास अधिकारी आहेत. जर देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार दोघांची हत्या करण्यात आली असेल तर ती हत्या घडविणारा तिसरा व्यक्ती कोण? याचा शोध लावण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर असणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
Next Post

ईडी कोठडीत नवाब मलिकांची प्रकृती बिघडली ; जेजे रुग्णालयात केले दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात मंगळवारी ५० मिलीमीटर पावसाची नोंद

August 18, 2021

धरणगाव रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना स्टेशन सल्लागार समितीतर्फे तिरंगा वाटप !

August 13, 2022

बीसीसीआयचा मोठा निर्णय, रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द

January 30, 2021

चंद्रकांत पाटलांनी दिला इशारा ; म्हणाले… ‘मोदींवर आई-वडीलांपेक्षाही अधिक श्रद्धा, गप्प बसणार नाही’

November 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group