अमरावती (वृत्तसंस्था) अमरावतीतल्या रहिमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सात वर्षांच्या चिमुकलीवर २५ वर्षीय नराधमाने दोनदा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अजय तेलगोटे असं या नराधमाचं नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अजय नावाच्या नराधमाने या सात वर्षांच्या चिमुरडीला घराच्या शेजारी नेऊन तिच्यावर अत्याचार केले.
अजय नावाचा हा तरूण या मुलीला फिरायला घेऊन जात असे. पीडित मुलीचे आई वडीलही त्याला व्यवस्थित ओळखत होते. कधी शेतात किंवा गावात या मुलीला तो फिरायला घेऊन जात असे. अशात तो तिला फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन गेला आणि तिच्यावर दोनदा बलात्कार केला. हा सगळा प्रकार पीडित मुलीने आपल्या आई वडिलांना सांगितला. ज्यानंतर पीडित मुलीच्या आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून या अजय नावाच्या तरूणाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांना मिळालेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भातला पुढील तपास रहिमपूर पोलीस करत आहेत.