नशिराबाद /जळगाव (प्रतिनिधी) नागपूर येथे हिवाळी अधिवेशना दरम्यान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत ६७ कोटींची नशिराबाद पाणीपुरवठा योजनेस मंजुरी बाबत आयोजित बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. नशिराबादसाठी वाघुर धारण हा शाश्वत स्रोत असल्याने या धरणावरून कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना तात्काळ कार्यान्वित करून वाघुर धरणातील पाणी आरक्षण तात्काळ मंजूर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाला दिले असून सदरची पाणीपुरवठा योजना अमृत टप्पा -२.०० मध्ये समाविष्ठ करून करण्याचे निर्देशही दिले आहे. पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलजीवन मिशन वरदान ठरत असल्याने कुणीही तहानलेला राहू नये यासाठी अधिकाऱ्यांनी सजग राहून पाणीपुरवठा योजनांना गती देण्याव्हेही निर्देश मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिले असून त्यामुळे नशिराबाद पाणी पुरवठा योजनेचा मार्ग मोकळा झाला असून शहरवासियांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठा दिलासा दिला आहे.
नशिराबादचा कायापालट करून दाखवू आणि ६७ कोटींची पाणीपुरवठा योजना तडीस लावून वाघुर धरणावरून नशिराबाद करांची तहान भागविणार अशी ग्वाही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मागील महिन्यात नशिराबाद येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी ग्वाही दिली होती. सद्यस्थितीत नशिराबाद शहरासाठी तत्कालीन ग्रामपंचायत काळात राष्ट्रीय पेयजल मिशन मधून शेळगाव बॅरेज येथून ७० लिटर्स प्रती मानसी या प्रमाणे पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे. नशिराबाद नगर परिषद स्थापने नंतर नागरी भागात १३५ लिटर्स प्रती मानसी या प्रमाणे पाणी पुरवठा करणे गरजेचे आहे. त्यामुळे शास्वत स्त्रोत असलेल्या वाघूर नदी प्रकल्प येथून मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे नशिराबाद शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजना प्रस्तावित केली होती.
अशी असेल नशिराबाद शहर पाणी पुरवठा योजना
पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नशिराबाद करांना दिलेला शब्द पाळला असून नशिराबाद करांसाठी वाघुर धरणावरून नशिराबाद करांची तहान भागविणार आहे. खालील उपांगाचा समावेश असेल शुद्ध पाण्याची अंतर्गत 50.23 किमी पाईपलाईन – जॅकवेल, इंटेक विहीर, इन्स्पेक्शन पाईप लाईन, अप्रोच पुल ई धरण क्षेत्रातील कामे, – अशुद्ध पाणी(धरणातील) जलवाहिनी (1730मी), अशुद्ध पाणी(धरणातील) गुरुत्ववाहिनी (16.20 किमी), मुख्य जल वितरण वहिनी (3.2 किमी), – 4 MLD क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र, जॅकवेल पंपिंग मशिनरी, जलशुद्धीकरण केंद्र पंपिंग मशिनरी, जलशुद्धीकरण केंद्र ते शहरातील पाण्याच्या टाक्याना जोडणारी पाइपलाइन, 17 लाख लिटर्स क्षमतेचे 4 जलकुंभ (पाण्याची टाकी), 180KWH क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प, इतर अनुषंगिक तांत्रिक बाबीचा समावेश आहे.
यांची होती उपस्थिती
मुख्यमंत्री सचिवालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव के एच गोविंद राज, उद्योग विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, यांच्या सह म.जी. प्रा.चे मुख्य अभियंता भुजबळ , अधिक्षक अभियंता सुनंदा नरवाडे , कार्यकार अभियंता शिवराम निकम, नगरपालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे , प्रकल्प व्यवस्थापन सल्लगार राहुल सूर्यवंशी , जि. प. चे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, शिवसेनेचे माजी सरपंच विकास पाटील, शहर प्रमुख विकास धनगर, युवासेनेचे चेतन बऱ्हाटे ,निळकंठ रोटे, प्रवीण पाटील, आदी उपस्थित होते. बैठकीनंतर योजना मंजूर होताच शिवसेना- भाजपा युतीच्या पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष करून उपस्थित शिवसेना- भाजपा महायुती युती तर्फे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा शाल, बुके व श्रीफळ देऊन सत्कार करून आभार मानले .
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नशिराबादकरांना अमृत टप्पा २.० अंतर्गत नवीन ६७ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देत भेट दिली आहे. काल झालेल्या बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतला. यामुळे नशिराबादकरांना नवीन योजनेच्या माध्यमातून दरडोई १३५ लीटर पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे. राष्ट्रीय पेयजलच्या पूर्वीच्या योजनेत नशिराबादकरांना दरडोई ७० लीटर पाणीपुरवठा होत होता. मात्र कालांतराने नशिराबादचे नगरपरिषदेत रूपांतर झाल्याने पाण्याची गरज व मागणी वाढली. यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री म्हणून मी नशिराबादसाठी नवीन योजनेसाठी सातत्याने आग्रही होता. वाघूर धरण हा शाश्वत पाणीपुरवठ्याचा स्त्रोत असल्याने या धरणातून अमृत टप्पा २.० अंतर्गत पाणी पुरवठा करण्याबाबत प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मंजुरी दिली. नशिराबादकरांसाठी आनंदाचा दिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे मनपूर्वक आभार !
– पालकमंत्री, गुलाबराव पाटील