चोपडा (प्रतिनिधी ) बऱ्हाणपूर – अंकलेश्वर रस्त्यावर चोपडा पासून अवघ्या सात ते आठ किलोमीटर अंतरावरील देवयानि पेट्रोल पंपच्या हॉटेलं दाजीबा जवळ मागून येणाऱ्या ट्रकने मोटारसायकलला जवळपास तीस चाळीस फूट फरफटत नेले यात चोपड्याचे कृषि पर्यवेक्षक मनोहर फकिरा पाटील ( ह. मु.छत्रपती शिवाजी नगर,परीस पार्क, मुळ रहिवासी दोंडवाडे ता चोपडा) यांच्या जागीच मृत्यू झाला.
सविस्तर असे की, कार्यलयाचा कामासाठी आपल्या कार्यक्षेत्रावरून काम आपटून कृषि पर्यवेक्षक मनोहर फकिरा पाटील हे आपल्या मोटारसायकल क्रमांक एम. एच. 19 बी आय 0154 या गाडीने घराकडे म्हणजेच चोपड्याकडे येत असताना गूळ नदीचा पूल पार करून हॉटेलं दाजीबा जवळ मजूर भरलेली (नंबर एम.एच.19 सी.डबल्यु 9275) मागून येणाऱ्या ट्रकने मोटार सायकलला धडक देऊन तीस ते चाळीस फूट फरफटत नेले यात मनोहर फकिरा पाटील यांच्या डोक्याला व पायाला जबर मार लागल्याने व ते ट्रकच्या बंपर मध्ये अडकले होते. ट्रक ड्रायव्हरने तरीही आपल्या हातातील ट्रक तशीच पुढे नेण्याचे प्रयत्न केला परंतु मोटारसायकल व मनोहर पाटील हे स्वतः अडकल्याने ट्रक काही अंतरावर जाऊन थांबली तद्नंतर ट्रक ड्रायव्हर हा अपघाताची स्थिती पाहिल्या नंतर थेऊन पसार झाला. परंतु मनोहर पाटील हे त्याचं जागी गतप्राण झाले होते याबाबत चोपडा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदचे काम सुरू होते मनोहर पाटील यांचे शवविच्छेदन साठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यावेळी ही वार्ता गावात कळताच शहरातील त्यांचे नातेवाईक ,मित्र मंडळी,परिसरातील मंडळीनी एकच गर्दि केली होती.त्याच्या पश्चात् वडील फकीरा रामदास पाटील.यांचा मुलगा वासुदेव ,भाईदास, रोहिदास पाटील यांचे बंधु होते त्यांना धर्मपत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार होय.