TheClearNews.Com
Friday, February 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सशस्त्र टोळक्याने काका-पुतण्याचा घरासमोरच केला मध्यरात्री खून !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 21, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

यवतमाळ (वृत्तसंस्था) पूर्ववैमनस्यातून एकाच कुटुंबातील तिघांवर कोयता, चाकूने सपासप वार करून तिहेरी हत्याकांड घडविण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून, एक गंभीर जखमी आहे. ही घटना पुसद येथील विठाळा स्थित हनुमंत बापू मंदिरालगत २० जुलैच्या पहाटे दीड वाजताच्या सुमारास घडली. दुहेरी हत्याकांडाच्य घटनेने पुसद हादरून गेले आहे. राहुल हरिदास केवटे (४५), क्रिश ऊर्फ सुमित विलास केवटे (२०) अशी मृतांची नावे आहेत. तर बंटी हरिदास केवटे हा गंभीर जखमी आहे.

नेमकं काय घडलं ?
या संदर्भात अधिक असे की, आरोपी गणेश तोकड व अव चव्हाण हे दोघे बुधवारी रात्री १०:३० वाजता केवटे यांच्या घरासमोर आले. त्यावेळी त्या दोघांना घराजवळ बसू नका, असे म्हणताच त्यांनी फिर्यादी नयन अनिल केवटे याच्याशी वाद घातला. दरम्यान, राहुल केवटे, बंटी केवटे, क्रिश केवटे या तिघांनी येऊन हा वाद सोडविला. आरोपी गणेश तोरकड व अवी चव्हाण तेथून निघून गेले जाताना त्यांनी तुम्हाला पाहून घेतो, अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी नयन केवटे हा घरी परत आला. तेव्हा राहुल केवटे, बंटी केवटे व क्रिश केवटे हे घराच्या ओट्यावर बसून होते. रात्री १ वाजेच्या सुमारास गणेश तोरकड हा त्याचे साथीदार पवन वाळके, नीलेश थोरात, गोपाल कापसे, गणेश कापसे, अवी चव्हाण यांना घेऊन आला. या सर्वांनी कोयते व असल्याने चाकूने एकाच वेळी तिघांवर हल्ला चढविला. त्यात राहुल हरिदास केवटे, क्रिश विलास केवटे हे दोघे गंभीर जखमी झाले. हल्लेखोरांच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न करीत असताना बंटी हरिदास केवटे याच्या पाठीवर कोयत्याने वार करण्यात आला.

READ ALSO

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक गोळा !
आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक गोळा झाल्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. जखमींना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी राहुल केवटे व क्रिश केवटे या काका-पुतण्याला मृत घोषित केले. बंटी केवटे याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध वसंतनगर पोलिसात भादंविचे कलम ३०२, ३०७, १४७, १४८, १४९ व आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध घेतला जात नाही, तो पर्यंत दोन्ही मृतदेह पोलीस स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणून ठेवण्याची भूमिका मृतकांच्या कुटुंबीयासह भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे यांनी घेतली. त्यामुळे स्थानिक उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय व शहर पोलीस स्टेशन ते मुखरे चौकादरम्यान तणाव निर्माण झाला होता.

अंत्ययात्रेला पोलीस संरक्षण !
शहर पोलीस स्टेशनकडे येणाऱ्या दोन्ही मार्गावर राज्य राखीव दलाची तुकडी व पोलीस तुकडी तैनात करून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर यांनी २४ तासाच्या आत आरोपींचा शोध घेतला जाईल, असे आश्वासन दिल्याने मृतकाच्या कुटुंबीयांकडून शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आले होते. मृतकाच्या घरापासून तर हिंदू मोक्षधामापर्यंत अंत्ययात्रेला पोलीस संरक्षण पुरविण्यात आले होते. दरम्यान, मृतक आणि मारेकरी एकाच परिसरात राहतात. आरोपींना ‘तू इतरांजवळ आमच्या चुगल्या का करतोस’ असं विचारणा केले असता वादास तोंड फुटले होते. शेजाऱ्यांच्या मध्यस्थीने तो वाद मिटला होते. परंतू सहाही आरोपींनी माहूर रोडवर एका धाब्यावर एकत्रित पार्टी करून मद्यप्राशन करीत दिवटे बंधूचा मारण्याचा कट रचला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
गुन्हे

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

February 12, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
Next Post

ब्रेकिंग : जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल आणि जि.प. सीईओ डॉ. पंकज आशिया यांची बदली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नितेश राणेंचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

December 30, 2021

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित, ३ झाले बरे !

September 20, 2021

सरपंचाच्या खोट्या सह्या करून धनादेश वटवले ; झुरखेडा ग्रामपंचायतमधील धक्कादायक प्रकार

October 11, 2020

अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; ४९ वर्षीय व्यक्तीविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल !

June 26, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group