धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील शहरातील बेलदार शॉपींग कॉम्प्लेक्सला लागून असलेल्या ओमसाई ईलेक्ट्रिक दुकान अज्ञात चोरट्याने फोडून २५ हजार रुपये किंमतीची कॉपर वायर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
दिपक डिंगबर पाटील (वय ३७ वर्ष, धंदा मोटार वायंडीग, रा. पिंपळे बु.) यांचे बेलदार शॉपींग कॉम्प्लेक्स लागून ओमसाई ईलेक्ट्रिक नावाचे दुकान आहे. १६ मार्चच्या रात्री ९ वाजेच्या सुमारास दुकान बंद करून ते घरी निघून गेले. दि. १७ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास नेहमी प्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले असता दीपक पाटील यांना दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले. अज्ञात चोरट्यांनी दुकानातून २५ हजार रुपये किंमतीची अंदाजे ३५ किलो वजनाची कॉपर वायर ही चोरुन नेली होती. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करणात आल असून पुढील तपास पोहेकॉ महेंद्र पाटील हे करीत आहेत.