नागपूर (वृत्तसंस्था) नागपूरमध्ये (nagpur ) हत्या (Murder )आणि आत्महत्येची (suicide) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईच्या पोटात चाकून खुपसल्यानंतर अभियंता (Engineer) असलेल्या मुलाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. लीला विष्णू चोपडे (वय ७४) व श्रीनिवास विष्णू चोपडे (वय ५१), अशी मृतकांची नावे आहेत.
नागपुरातील हिंदुस्तान कॉलनीमध्ये असलेल्या या मोठ्या घरात श्रीनिवास आपल्या आईसोबत राहत होता. श्रीनिवास हा इंजिनीअर असून त्याने लग्न केलेले नव्हते, तो नोकरीसुद्धा करत नव्हता. इतक्या मोठ्या घरात दोघेच मायलेक राहत होते. गेल्या तीन-चार दिवसांपासून त्यांचा संपर्क होत नसल्यामुळे आणि मोबाईल बंद असल्यामुळे नातेवाईकांनी त्याच्या घरी धाव घेतली. त्यावेळी सर्व बाजूंनी आतमधून कुलूप लावलेले असल्यामुळे नातेवाईकांचा संशय बळावला. त्यानंतर नातेवाइकांनी धंतोली पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली.
धंतोली पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाल्यानंतर घर आतून कुलूप बंद असल्यामुळे मुख्य दरवाजा तोडण्यात आला आहे. त्यानंतर बेडरूममध्ये पोलीस गेल्यावर जे चित्र पोलिसांना दिसल ते थरकाप उडवणार होत. नागपूरच्या धंतोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीनिवास आणि त्याच्या आईचा मृतदेह हा चार ते पाच दिवस पूर्वीचा असून कुजलेल्या अवस्थेत बेडरूममध्ये आढळून आला. श्रीनिवासने आत्मघातकी पाऊल का उचलले याचा पोलीस तपास करत असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.