साकळी (प्रतिनिधी) सर्व अन्याय ग्रस्त आदिवासी कोळी समाज बांधवाची माजी मंत्री दशरथ भांडे यांचे मार्गदर्शनाखाली ९ डिसेंबर २०२० रोजी मुंबई येथे होणाऱ्या आक्रोश मोर्चाच्या नियोजना बाबत जिनींग प्रेसिंग सभागृह यावल येथे २१ नोव्हेंबर शनिवारी ११ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्ष नितीनजी कांडेलकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीत अँड़. गणेश सोनवणे संयोजक, यावल तालुका जि.प. सदस्य तथा गटनेते प्रभाकरआप्पा सोनवणे, प्रल्हाद सोनवणे उत्तर विभागीय उपाध्यक्ष. मंगल कोळी जि अध्यक्ष कर्मचारी संघटना प्रशांत सोनवणे जि. युवक आघाडी. मा. सुनीताताई कोळी महिला आघाडी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने समाजातील तरुण बांधवानी व कर्मचारी वर्गानी तसेच जेष्ठ श्रेष्ठ समाज बांधवानी उपस्थित राहावे. भरत कोळी यावल, आकाश कोळी, गोकुळ कोळी मनवेल, किरण कोळी दहिगाव, अमोल कोळी यावल, अनील कोळी निमगाव, डिगंबर कोळी, दत्तात्रय नन्नवरे यावल, योगेश कोळी, समाधान सोनवणे थोरगव्हाण, गजानन कोळी पींप्री, रोहिदास कोळी, गंगाराम तायडे साकळी, जालंदर व्ही कोळी (प्रसिद्धी प्रमुख आदिवासी संघर्ष समिती यावल ) यांनी केले आहे.