नागपूर (वृत्तसंस्था) महाराष्ट्राच्या संकटाच्या परिस्थिती आंध्र प्रदेश महाराष्ट्राच्या मदतीला धावला आहे. महाराष्ट्राला मदत करावी अशी विनंती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना केली होती. जगनमोहन रेड्डी यांनी महाराष्ट्राला ३०० व्हेंटिलेटर्स देण्याची घोषणा केली
नागपूरसह महाराष्ट्रात सुरू असलेला कोरोनाचा उद्रेक पाहता व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन तसेच अन्य औषधे मिळविण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. याच प्रयत्नांतून त्यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांच्याशी फोनवर चर्चा करून त्यांच्याकडे व्हेंटिलेटर्सची मागणी केली होती. ना. गडकरींच्या या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री रेड्डी यांनी महाराष्ट्राला ३०० व्हेंटिलेटर्स देण्याची घोषणा केली. आंध्र प्रदेश सरकारतर्फे जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात या मागणीचा उल्लेखही करण्यात आला आहे. गडकरी यांनी मुख्यमंत्री रेड्डी यांच्याशी संपर्क साधला व व्हेंटिलेटर्स दिल्याबद्दल त्यांचे आभारही मानले.