धरणगाव (प्रतिनिधी) येथील कै. किसन गबा महाजन व कै. राजेंद्र किसन महाजन यांच्या स्मरणार्थ भटुलाल किसन महाजन यांच्यातर्फे व समस्त माळी समाज पंच मंडळाचा सहकार्यातून अखंड किर्तन सप्ताहचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
गेल्या38 वर्षापासून होत असलेल्या या कार्यक्रमात जिल्ह्यातील नामांकित किर्तनकार सहभागी होणार आहेत. तरी सर्व भाविक बंधु-भगिनींना या ज्ञानामृताचा लाभ घ्यावा असे आवाहन समाज पंच मंडळाने केले आहे. दैनंदिन कार्यक्रम खालील प्रमाणे काकड आरती सकाळी 4 ते 5.30, हरिपाठ संध्याकाळी 5 ते 6 किर्तनाचा कार्यक्रम रात्री 8 ते 10 पर्यंत लहान माळी वाडा येथे होणार असून संपूर्ण सप्ताहात जिल्ह्यातील राज्यपातळीवरील नामांकित किर्तनकार सहभागी होणार आहेत.
बुधवार दि.20 सप्टेंबर रोजी ह.भ.प.श्री. गजानन महाराज, सोनटके (आळंदी) दि.२१ सप्टेंबर गुरुवारी ह.भ.प. राजेंद्र महाराज, कासोदा, दि. २२ सप्टेंबर शुक्रवारी ह.भ.प. सी. एस. पाटील सर महाराज, धरणगाव, २३ सप्टेंबर शनिवार रोजी ह.भ.प. कु. वैष्णवी दिदि महाराज, आळंदीकर (वय वर्ष १२ बालकिर्तनकार) दि. 24 रविवार ह.भ.प.श्री. गोपाल महाराज, आळंदीकर. दि.25 सप्टेंबर सोमवार ह.भ.प. धनश्रीताई शिंदे महाराज, भडगांवकर. दि.26 सप्टेंबर मंगळवार.ह.भ.प. योगेश महाराज, वरझडीकर, २७ सप्टेंबर बुधवार ह.भ.प.श्री. जिवराम महाराज सुर्यवंशी, कापडणेकर यांचे काल्याचे किर्तन होईल. तसेच सकाळी 9ते12 वाजेपर्यंत पालखी मिरवणुक काढण्यात येणार असून दुपारी 12ते 2 वाजेपर्यंत महाप्रसाद चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी समाज बांधवानी सहभागी व्हावे असे आवाहन, श्री समस्त माळी समाज पंच मंडळातर्फे करण्यात आले आहे.