अमळनेर (प्रतिनिधी) पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन वाचनालयाचे संचालक अँडवोकेट रामकृष्ण उपासनी यांनी केले तर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन संचालक ईश्वर महाजन यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे होते. लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच यांच्या कार्यावर वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ व ज्येष्ठ संचालक भीमराव जाधव यांनी प्रकाश टाकला तर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर वाचनालयाचे संचालक ईश्वर महाजन, विश्वस्त बापू नगावकर यांनी प्रकाश टाकला.
वाचनालयात वाचक वर्गांसाठी अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक यांचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. वाचक वर्गाने त्याचा आस्वाद घेतला. अध्यक्षीय भाषणात वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांचे कार्य बहुजन समाजासाठी प्रेरणादायी आहे तर लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करून लोकांमध्ये जनजागृती निर्माण केली असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयुक्त चिटणीस सुमित धाडकर यांनी केले. यावेळी वाचनालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.