जळगाव (प्रतिनिधी) राज्य शासनाकडून २३ नोहेंबर २०२० पासून राज्यातील इयत्ता ९ वी ते १२ वी चे वर्ग सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला असून त्याबाबत सविस्तर मार्गदर्शन सूचना देखील निर्गमित करण्यात आलेल्या आहे.
शासन परिपत्रक १५ जून २०२० अन्वये स्थानिक पद्धतीनुसार प्रत्यक्ष शाळा टप्या – टप्याने सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांचे साह्याने सबंधित शाळा व्यवस्थापन समिती यांना प्रदान करण्यात आलेले आहेत. तसेच कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्याचे थांबू नये यासाठी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. जळगाव जिल्ह्यातील सदय स्थिती ॲक्टिव रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ दिवाळी सणाच्या कालावधीनंतर मोठ्या प्रमाणात जळगाव जिल्ह्यात नागरिकांची ये-जा झाल्याने कोविड-१९ च्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने होणारे सभाव्य परिणाम आणि शालेय व्यवस्थापन समिती व पालक संघ यांचेकडून प्राप्त झालेले अभिप्राय लक्षात घेता सद्यस्थिती मध्ये जळगाव जिल्ह्यातील इयत्ता ९ वी ते १२ वी चे वर्ग, आश्रम शाळा व वसतिगृह अश्या परिस्थितीत मध्ये सुरू करणे उचित ठरणार नाही, अशी अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आहे.
जळगाव जिल्ह्यातील ९ वी ते १२ वी चे वर्ग, आश्रमशाळा व वसतिगृह ७ डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार नाहीत. मात्र विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाची सुविधा सुरू राहील.