उल्हासनगर (वृत्तसंस्था) उल्हासनगरमध्ये नात्याला काळीमा फासणारं एक प्रकरण समोर आलं आहे. येथील एका ३४ वर्षीय मामाने आपल्या ६ वर्षीय भाचीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मामाला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आई भाजी विक्रीचा व्यवसाय करत असल्याने पीडित मुलगी त्याच परिसरात राहणाऱ्या आपल्या मामाच्या घरी नेहमी खेळण्यास जात होती. मात्र, घरात कोणी नसल्याचा फायदा घेत नराधम मामा आपल्या सहा वर्षाच्या अल्पवयीन भाजीचे लैंगिक शोषण करत तिच्यावर बलात्कार करत होता. रवि लक्ष्मण झंझावटीया (वय ३४) असं आरोपी मामाचं नाव असून सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे तब्बल दोन महिने हा अत्याचार सुरू होता. ही बाब उघड झाल्यानंतर या प्रकरणी हिललाईन पोलिस स्टेशनमध्ये मुलीच्या कुटुंबाकडून आरोपी मामा विरोधात पोक्सा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली असून न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर आरोपीला कठोरी शिक्षा व्हावी अशी पीडितेच्या कुटुंबियांची माहिती आहे. दरम्यान, पीडित चिमुकलीचीही वैदकीय चाचणी होणार असल्याची माहिती आहे.