बांका (वृत्तसंस्था) बिहारमधील बांका जिल्ह्यातील चंदन पोलिस स्टेशन परिसरात आठ वर्षीय मुलीचे अपहरण करून चार नराधमांनी सामूहिक बलात्कार (Gang atrocities) केला. याप्रकरणी कुटुंबीयांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले. एका आरोपीच्या मुलाला जमुई येथून ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी पाच वर्षाच्या भावासह घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या दुर्गा मंदिराजवळ होळी खेळण्यासाठी गेली होती. एका व्यक्तीने तरुणी आणि तिच्या भावाला गाडीत बसवले. काही अंतर गेल्यावर त्याने भावाला टाकून मुलीचे अपहरण केले. मुलगी बेपत्ता असल्याच्या संशयावरून कुटुंबीयांनी तिचा शोध घेऊन चंदन पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार दिली.
रात्री ११ वाजण्याच्या सुमारास कुटुंबीय चंदन रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या नाल्याजवळ पोहोचले असता दोन-चार कुत्रे घिरट्या घालताना दिसले. कुटुंबीयांनी जाऊन बघितले असता पाय वाळूने झाकलेले दिसले. वाळू बाजूला केल्यानंतर मुलीचा मृतदेह नग्नावस्थेत दिसला. मुलीच्या अंगावर जखमा होत्या. तसेच डोळे काढले होते. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन बांका येथे पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी चंदनबाजारचे रहिवासी अजय वरनवाल, टोटो चालक डोमन पासवान आणि श्रीधर वरनवाल ऊर्फ छोटू वरनवाल या आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच टोटो मालक सागर सोनी याच्या मुलाला पोलिसांनी जमुई येथून अटक केली आहे.