पुणे (वृत्तसंस्था) आईच्या मानलेल्या भावानेच १३ वर्षीय भाचीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिडीतेला तुझ्या आई-बाबांना मारून टाकीन,’ अशी धमकी आरोपी मामाने दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तक्रारदार महिलेचा मानलेला भाऊ आहे. त्यामुळे तो तक्रारदाराच्या घरी अधूनमधून राहायला यायचा. एकेदिवशी तक्रारदार आणि त्यांचे पती कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी पिडीत मुलगी घरी एकटीच होती. याचाच फायदा घेत आरोपी मामाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. एवढेच नव्हे तर ‘तुझा व्हिडिओ माझ्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला आहे. या प्रकाराबाबत तू कोणाला सांगितलेस, तर मी तुला आणि तुझ्या आई-बाबांना मारून टाकीन,’ अशी धमकी देखील आरोपीने पिडीतेला दिली. त्यामुळे घाबरलेल्या पीडित मुलीने काही महिने हा प्रकार आई-वडिलांना सांगितला नव्हता.