मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणीप्रकरणी गोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीप्रकरणी चौथा गुन्हा दाखल झाला आहे. काल रात्री गोरेगाव पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलंबित मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे हेही या प्रकरणात आरोपी आहेत. या गुन्ह्यात परमबीर सिंह यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह उर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह उर्फ बबलू आणि रियाज भाटी यांच्या विरोधात हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विमल अग्रवाल नावाच्या व्यापाऱ्यानं हा गुन्हा नोंद केला आहे.
यापुर्वी मुंबईचे परमबीर सिंह यांना सेवानिवृत्त न्यायमूर्ती के यू चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी आयोगाने परमबीर सिंह यांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.