मुंबई (वृत्तसंस्था) PMC बँक घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत या काल चौकशीसाठी उपस्थित राहिल्यात. मिसेस राऊत यांच्या आधी शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांची तसेच त्यांच्या परिवाराची मार्फत ‘टॉप्स ग्रुप’ संबंधित चौकशी केली गेली. दरम्यान शिवसेनेचा आणखी एक नेता सक्तवसुली संचलनालयाच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे. हा नेता शिवसेनेचा माजी खासदार असून अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या एका स्थानिक नेत्याचा नातेवाईक असल्याचं सांगितलं जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, एचडीआयएल PMC बँकेत घोटाळा करुन मिळवलेल्या निधीचा मोठा हिस्सा या राजकीय नेत्याला मिळाला आहे. त्यामुळे ईडीकडून आता या शिवसेना नेत्याची झाडाझडती घेतली जाणार असल्याचे सांगितले जाते. याच प्रकरणात सोमवारी खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ईडीकडून चार तास चौकशी करण्यात आली. प्रवीण राऊत हे पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्यातील आरोपी आहेत. प्रवीण राऊत यांच्याशी संजय व वर्षा राऊत यांचे आर्थिक संबंध असून, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे. संशयाच्या आधारे चौकशीसाठी ईडीने वर्षा राऊत यांना चौकशीसाठी नोटिसा बजावल्या होत्या. दोन वेळा तब्येतीचे कारण देत त्यांनी चौकशी टाळली. परंतु, सोमवारी त्या चौकशीसाठी बलार्ड पीयर येथील कार्यालयात हजर झाल्या होत्या.
एचडीआयएल PMC बँकेत घोटाळा करुन मिळवलेल्या निधीचा मोठा हिस्सा या राजकीय नेत्याला मिळाला आहे. त्यामुळे ईडीकडून आता या शिवसेना नेत्याची झाडाझडती घेतली जाणार असल्याचं कळतंय.