मुंबई (वृत्तसंस्था) इन्कम टॅक्सच्या रडारवर असलेला दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नूविरोधात इन्कम टॅक्स विभागाला मोठा पुरावा सापडला आहे. कोट्यवधींची हेराफेरी झाल्याचं आयटीला समजलं आहे. दोन दिवसांच्या या छापेमारीत तब्बल ६५० कोटी रुपयांची करचोरी झाल्याचे पुरावे IT विभागाच्या हाती लागले आहेत.
केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) ने गुरूवारी असा दावा केला आहे की, आयकर विभागाद्वारे दोन फिल्म निर्माण कंपनी आणि एका अभिनेत्रीवर छापा मारण्यात आला. बुधवारी सकाळी छापा मारल्यानंतर आयकर विभागाची कारवाई रात्री उशिरापर्यंत संपली. यावेळी मुंबई आणि पुण्यात चौकशी करण्यात आली. यानंतर गुरूवारी देखील छापा मारण्यात आला. दोन दिवसांच्या या छापेमारीत ६५० करोड रुपयांच्या आर्थिक अनियमिततेची माहिती मिळाली आहे. यामध्ये अद्याप कुणाचं नाव घेण्यात आलेलं नाही. बुधवारी अनुराग कश्यप, तापसी पन्नू यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली. ही छापेमारी फँटम फिल्मच्या विरोधात टॅक्स चोरीच्या आरोपाखाली करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे ही छापेमारी मुंबई, पुणे आणि हैद्राबाद अशी २८ ठिकाणी करण्यात आली. यामध्ये कलाकार, प्रतिभा प्रबंधन कंपनी केडब्ल्यूएएन आणि ऍक्सीडच्या काही अधिकाऱ्यांच्या समावेश होता.
दरम्यान फँटम आणि क्वान या दोन्ही टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीमार्फत मोठ्या रकमेचा ई-मेल, व्हॉट्सप चॅट्स असा डिजीटल डेटा हार्ड डिस्क स्वरूपात सिझ करण्यात आला आहे. तसंच ७ बँक लॉकरही असल्याचं समजलं आहे, तेदेखील सिझ करण्यात आले आहेत. अद्यापही तपास सुरू आहे. पुढील तीन दिवस ही कारवाई सुरू राहू शकते, असं सांगितलं जातं आहे.
‘फँटम फिल्म’आणि ‘क्वान’ या कंपन्यांशी संबंधित असलेल्यांवर हे छापे टाकण्यात आले. त्यांनी कर चोरी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं आयकर विभागानं म्हटलं आहे. फँटम फिल्म्स चित्रपट निर्मिती आणि त्याचं वितरण करण्याचं काम करते. अनुराग कश्यप, दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाणे, निर्माता मधू मंटेना आणि विकास बहल यांनी ही कंपनी २०११ मध्ये सुरू केली होती. सहसंस्थापक विकास बहलवर लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यानंतर कंपनी २०१८ मध्ये बंद करण्यात आली होती.
छापेमारीत आयकर विभागाला मिळाला महत्वाच्या गोष्टी
सिनेमा निर्मितीशी जोडलेल्या दुसऱ्या कंपनीवर छापे मारले त्यामध्ये अनुराग कश्यप यांचा संबंध आहे. सीबीडीटीने सांगितलेल्या माहितीमध्ये बॉक्स ऑफिसवरील सिनेमाच्या कमाईच्या तुलनेत या कंपनीनेने आयकर विभागाला अतिशय कमी माहिती दिली आहे. यामाहिती फिल्म दिग्दर्शक आणि निर्मात्यांमध्ये काही हेरफेर झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ३५० करोड रुपयांचा कर अनैच्छिक आहे. या प्रकरणाची पुढे चौकशी केली जाईल.
सीबीआयचा दावा
सीबीआयचा असा दावा आहे की, लोकप्रिय अभिनेत्री तापसी द्वारे पाच करोड रुपयांचो रोख रक्कम प्राप्त केली आहे. याबाबत पुढील चौकशी सुरू आहे. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. दरम्यान या दोन्ही सेलिब्रिटींच्या समस्या अधिक वाढणार आहे. आयकर विभागानंतर सक्तवसुली संचलनाद्वारे (ED) देखील त्यांची चौकशी केली जाणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
















