मुंबई (वृत्तसंस्था) देशातील ओमिक्रॉनची (Omicron) दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता देशातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या १,४३१ वर पोहोचली आहे. दरम्यान महाराष्ट्र सर्वाधिक ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात एकूण ४५४ रुग्ण आढळून आले (Maharashtra Has Maximum 454 Patients) असून, त्यापैकी १६७ बरे होऊन घरी परतले आहेत.
संख्या वाढल्याने केंद्र सरकारने सरत्या वर्षाच्या पूर्वसंध्येला आरोग्य मंत्रालयाकडून प्रत्येक पालिका आय़ुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना आदेश जारी झाले आहेत. मागील २४ तासांत देशात २२ हजार ७७५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, ८ हजार ९४९ रुग्ण बरे झाले आहेत. देशभरात एकूण ४०६ मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या भारतातील सक्रिय रुग्णांचा आकडा १ लाख ४ हजार ७८१ आहे. तर रिकव्हरी रेट ९८.३२% आहे
ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या १,४३१ वर
देशात आतापर्यंत ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १,४३१ वर पोहोचली आहे. यातील ४८८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात एकूण ४५४ रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी १६७ बरे होऊन घरी परतले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर राजधानी दिल्ली आहे. दिल्लीत तब्बल ३५१ रुग्ण आढळून आले. यापैकी ५७ रुग्ण बरे झाले आहेत.
महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?
मुंबई-३२७
पिंपरी-२६
पुणे ग्रामीण-१८
पुणे मनपा आणि ठाणे मनपा-प्रत्येकी १२
नवी मुंबई, पनवेल- प्रत्येकी ८
कल्याण डोंबिवली-७
नागपूर, सातारा-प्रत्येकी ६
उस्मानाबाद-५
वसई-विरार-४
नांदेड-३
औरंगाबाद, बुलढाणा, भिवंडी, मीरा भाईंदर-प्रत्येकी २
लातूर, अहमदनगर, अकोला, कोल्हापूर-प्रत्येकी १
एकूण-४५४
कोणत्या राज्यात किती रुग्ण? (कंसात बरे झालेले रुग्ण)
महाराष्ट्र – ४५२ (१६७)
दिल्ली – ३५१ (५७)
तामिळनाडू – ११८ (४०)
गुजरात – ११५ (६९)
केरळ – १०९ (१)
राजस्थान – ६९ (६१)
तेलंगाना – ६२ (१८)
हरयाणा – ३७ (२५)
कर्नाटक – ३४ (१८)
आंध्र प्रदेश – १७ (३)
पश्चिम बंगाल – १७ (३)
ओडिशा – १४ (३)
मध्य प्रदेश – ९ (९)
उत्तर प्रदेश – ८ (४)
उत्तराखंड – ४ (४)
चंदीगड – ३ (२)
जम्मू काश्मीर – ३ (३)
अंदमान आणि निकोबार – २ (०)
गोवा – १ (०)
हिमाचल प्रदेश – १ (१)
लडाख – १ (१)
मणिपूर – १ (०)
पंजाब – १ (१)
एकूण रुग्ण १४३१ (४८८)