जळगाव (प्रतिनिधी) जळगाव वाघूर धरण विभाग कार्यक्षेत्रातील वाघुर डावा कालवा जलाशय उपसा यावरील प्रकल्पावर काम करण्यात येणार आहे. जेथे शक्य असेल तेथे कालव्याव्दारे तसेच अधिसुचित/अनाधिसुचित लाभक्षेत्रातील नदी, नाले व इतर जलाशयातून उपसा सिंचनाने पाण्याचा उपयोग होणार आहे.
तसेच बागायतदारांना कळविण्यात येते की, चालू वर्षी प्रकल्पात उपलब्ध पाणीसाठ्यानुसार रब्बी हंगाम सप्टेंबर व फेब्रुवारी, या मुदतीत कपाशी, ज्वारी, गहु, हरभरा, बारमाही इतर बारमाही भाजीपाला इतर तेलबिया कडधान्य व भूसार पिके इत्यादी पिकांसाठी पिण्याचे पाण्याचे आरक्षण व्यतिरीक्त उपलब्ध साठयातून खालील अटीस अनुसरुन पाणी पुरवठा करण्याचे ठरविण्यात आले आहे. रब्बी हंगाम सन २०२०-२१ अखेर संपुर्ण थकबाकी भरणे आवश्यक राहील, पाटमोट संबंध नसावा, प्रत्येक चारीवर सलग क्षेत्रासच मंजुरी दिली जाणार आहे. शेतचारी स्वच्छ व गवत काढलेली असावी. प्रत्यक्ष पास मिळाल्याशिवाय मंजूरी मिळाली असे समजू नये, पाणी अर्जाच्या निर्णय संबंधित उपविभाग, पाटशाखेत/ ग्रामपंचायत कार्यालय नोटीस बोर्डावर जाहीर करण्यात येणार आहे.
मुदतीनंतर आलेले पाणी अर्जावर नियमानुसार जादा पाणीपट्टी आकारणी केली जाणार आहे. मंजुर क्षेत्रासच व मंजुर पिकानांच पाणी घ्यावे लागेल, पाणी अर्ज देतांना ७/१२ उतारा किंवा खाते पुस्तीका संबंधित उपविभागास दाखवावी लागणार आहे. असे कार्यकारी अभियंता, वाघुर धरण विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.