जळगाव (प्रतिनिधी) दिल्ली येथे झालेल्या बैठकीत अखिल भारतीय कोळी समाज संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष अजित पटेल, सरचिटणीस डॉ. एम. एल. माहौर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आमदार हरिशंकर माहौर यांनी नियुक्ती केली. माजी खासदार सत्यनारायण पवार, वीरेंद्र कश्यप, भानुप्रताप शर्मा, डॉ. प्रकाश बंडा, डॉ.कर्नल शांडिल्य, ऋत्विककुमार मकवाना, किशोर शेख आदी उपस्थित होते.