धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्याच्या शिंदे गटाच्या उपतालुका प्रमुखपदी ज्येष्ठ शिवसैनिक संजय वामन चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संजय चौधरी यांच्या निवडीबद्दल युवा सेनेचे नेते जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एसटी कामगार सेना तालुका प्रमुखपदी समाधान पाटील,शेतकरी सेनेच्या शहर प्रमुखपदी सत्यवान कंखरे, आदिवासी सेनेच्या शहर प्रमुखपदी नगरसेवक अजय चव्हाण यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील, जिल्हा प्रमुख निलेश पाटील, उपजिल्हा प्रमुख पी.एम. पाटील सर, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, तालुका प्रमुख गजानन नाना पाटील व सर्व धरणगाव शहरातील नगरसेवक कार्यकर्त्यांनी निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.